चीनच्या धरतीवर होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत आहे. नुकतेच 25 सप्टेंबर रोजी भारतीय महिला संघाने स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 19 धावांनी पराभूत करत पहिलं-वहिलं सुवर्णपदक पटकावलं. अशात आता भारतीय हॉकी संघही पहिल्या सामन्यापासूनच जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे.
भारतीय हॉकी संघाने पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानला 16-0ने पराभवाचं पाणी पाजलं होतं. यानंतर आता मंगळवारी (दि. 26 सप्टेंबर) दुसऱ्या सामन्यात भारताने सिंगापूरला पूल अ गटातील सामन्यात 16-1ने पराभूत केले. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) याने 4 गोल केले. तर मनदीप सिंग (Mandeep Singh) याने हॅट्रिक केली.
पहिल्या क्वार्टरमध्ये निराशाजनक प्रदर्शनानंतर भारतीय संघाने पूर्ण ताकद लावली आणि हाफ टाईमपर्यंत सिंगापूरवरील आघाडी 6-0 अशी केली. मनदीपने दोन गोल केले, तर ललित, गुरजंत, सुमित आणि विवेक यांनीही प्रत्येकी 1 गोल केले. दुसऱ्या हाफमध्ये भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्येच आणखी 5 गोल करत आपला इरादा स्पष्ट केला.
India beat Uzbekistan by 16-0 in the first match.
India beat Singapore by 16-1 in the second match.
– Dream start for India 🇮🇳 in Hockey in Asian Games. pic.twitter.com/DFsY7DNuXf
— Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2023
भारतीय हॉकी संघ मजबूत स्थितीत
या विजयाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 (Asian Games 2023)मध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. आत्मविश्वासाने भरलेल्या हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील अभियानाची सुरुवात दणक्यात केली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या भारताने या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानला 16-0ने आणि दुसऱ्या सामन्यात सिंगापूरला 16-1ने पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला.
भारताचा पुढील सामना कधी?
हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वातील भारतीय हॉकी संघ 28 सप्टेंबर रोजी गतविजेत्या जपान संघाविरुद्ध भिडणार आहे. त्यानंतर भारताला 30 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करायचे आहेत. यानंतर भारतीय संघ 2 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आशियाई क्रीडा स्पर्धांमधील अभिमान संपवेल. (big news asian games 2023 indian hockey team beat singapore harmanpreet singh mandeep singh scores)
महत्त्वाच्या बातम्या-
नाद करायचा नाय! Asian Gamesमध्ये उझबेकिस्तानविरुद्ध 16 गोलांचा पाऊस पाडत भारतीय हॉकी संघाचा रोमहर्षक विजय
हॉकीच्या मैदानावरही टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! 4-0 ने विजय मिळवत गाठली उपांत्य फेरी