क्रीडाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच आयओसीने लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन झाले आहे. सोमवारी (दि. 16 ऑक्टोबर) मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत, आयओसीने 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये नवीन खेळांच्या रूपात क्रिकेटसह (टी20), बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॉश यांनाही सामील करण्याची औपचारिक मंजुरी दिली.
खरं तर, आयओसीच्या (IOC) कार्यकारी बोर्डाने मागील आठवड्यात क्रिकेटला (Cricket In Olympics) स्पर्धेत सामील करण्यासाठी लॉस एंजेलिसच्या स्पर्धेच्या आयोजकांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यामध्ये क्रिकेटव्यतिरिक्त इतर चार खेळ- बेसबॉल/ सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॉश यांसारख्या खेळांचा समावेश आहे.
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याबद्दल आयओसीच्या सदस्या आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले, “140 कोटी भारतीयांसाठी, क्रिकेट फक्त एक खेळ नाहीये, हा एक धर्म आहे. त्यामुळे मला या ऐतिहासिक संकल्पाचा आनंद आहे. आमच्या देशात, इथे मुंबईत होत असलेल्या 141व्या आयओसी सत्रात पारित केले गेले होते. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला सामील केल्यामुळे नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये ऑलिम्पिकसाठी मोठी भागीदारी निर्माण होईल. तसेच, क्रिकेटच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेला महत्त्व मिळेल.”
IOC Session approves @LA28’s proposal for 5⃣ additional sports:
⚾Baseball/🥎softball, 🏏cricket, 🏈flag football, 🥍lacrosse and ⚫squash have been officially included as additional sports on the programme for the Olympic Games Los Angeles 2028. #LA28 pic.twitter.com/y7CLk2UEYx
— The Olympic Games (@Olympics) October 16, 2023
क्रिकेट, बेसबॉल/सॉफ्टबॉल आणि लॅक्रोस लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळात पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. तसेच, फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॉश ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळले जातील. खरं तर, आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी मागील आठवड्यात म्हटले होते की, क्रिकेट आणि इतर चार खेळांचा समावेश करणे अमेरिकेतील क्रीडा संस्कृतीनुसार होते.
बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, स्क्वॉश आणि फ्लॅग फुटबॉल या खेळांसोबतच क्रिकेट या पाचही खेळांना फक्त 2028मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळांसाठी मंजुरी मिळाली आहे. क्रिकेट हा खेळ 1900 वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकचा भाग होईल. (big news cricket makes historic return at la 2028 olympics after 120 years)
हेही वाचा-
कोण मिळवणार पहिला विजय? 14व्या सामन्यात लंकेने जिंकला टॉस, ‘एवढ्या’ बदलांसह भिडणार कांगारूंशी
विराटकडून जर्सीवर ऑटोग्राफ घेताच बाबरवर संतापला वसीम अक्रम; म्हणाला, ‘कॅमेऱ्यापुढे असे करण्याची…’