क्रिकेट या खेळाला भारतात जणू धर्मच मानले जाते. गल्ली ते दिल्ली क्रिकेट खेळाचे सर्व वयोगटातील चाहते पाहयला मिळतात. भारताप्रमाणेच जगभरातही क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आता याच क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खेळांचा महाकुंभमेळा म्हणजेच लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेट या खेळाचाही समावेश केला जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच, क्रिकेटसोबतच फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल या खेळांनाही सामील केले जाईल.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश
आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटनुसार, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 (Los Angeles Olympics 2028) महाकुंभमेळ्यात क्रिकेट (Los Angeles Olympics 2028) खेळाचा समावेश केला जाईल. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये अखेरचा समावेश 1900मध्ये केला गेला होता. आता 128 वर्षांनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. मात्र, अद्याप ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीये. तरीही असे म्हटले जात आहे की, या आठवड्याच्या अखेरीस 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते.
Five sports have been proposed by the @LA28 Organising Committee for inclusion at the Olympic Games in Los Angeles in five years' time:
⚾ Baseball-softball
🏏 Cricket
🏈 Flag football
🥍 Lacrosse
⚫ SquashThe final decision will be made in the coming days. pic.twitter.com/kU1303jY0A
— The Olympic Games (@Olympics) October 9, 2023
फेब्रुवारीमध्ये आयओसीने अंतिम रूप दिलेल्या 28 खेळांच्या यादीत क्रिकेटचा समावेश नव्हता. ऑलिम्पिकचा भाग बनण्यासाठी क्रिकेटच्या प्रयत्नांना मागील जुलैमध्ये आयओसीद्वारे पुनरावलोकनासाठी 9 खेळांच्या शॉर्टलिस्टमध्ये जोडले गेले होते. क्रिकेटव्यतिरिक्त बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, ब्रेक डान्सिंग, कराटे, किक बॉक्सिंग, स्क्वॉश आणि मोटरस्पोर्ट यांचाही त्यात समावेश होता.
आयसीसीने दिलेला सल्ला
या रिपोर्टमध्ये पुढे असेही सांगण्यात आले आहे की, लॉस एंजेलिस 2028 पुढे प्रेझेटेशनदरम्यान आयसीसीने पुरुष आणि महिलांच्या 6 संघांच्या टी20 स्पर्धेबाबत शिफारस केली होती. आयसीसीच्या पुरुष आणि महिला टी20 क्रमवारीतील अव्वल 6 संघांचा समावेश असेल. आयसीसीने टी20 स्पर्धेला सर्वोत्तम क्रिकेट प्रकाराच्या रूपात प्रस्तावित केले. कारण, लॉस एंजेलिस 2028 आणि आयओसी दोन्हींनी यावर जोर दिला होता की, क्रिकेट प्रकार असा असला पाहिजे, जिथे जागतिक चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाईल. मात्र, आयसीसीने संघांना अंतिम रूप दिले आहे. याची पुष्टी केली जाऊ शकत नाही.
क्रिकेट जगभरात खेळले जाते. मात्र, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट फक्त एकदा 1900च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळले गेले होते. त्यावेळी ग्रेट ब्रिटन संघाने फ्रान्सला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले होते. त्यावेळी सामना दोन दिवस खेळला गेला होता. (big news cricket to return to summer olympics after 128 years los angeles olympics 2028)
हेही वाचा-
राहुलचं विधान तुमच्याही काळजाला भिडेल! भारताच्या विजयानंतर म्हणाला, ‘लोक माझ्यावर…’
भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वी शुबमनच्या तब्येतीविषयी समोर आली मोठी माहिती, लगेच वाचा