---Advertisement---

MI विरुद्ध सामन्यापूर्वी धोनीचा मोठा खुलासा – IPL 2025 शेवटचा हंगाम?

On: रविवार, मार्च 23, 2025 3:07 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेला 22 मार्च पासून सुरुवात झालेली आहे. तसेच आज स्पर्धेतील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. या हंगामात चेन्नईच्या पहिल्या सामन्यात एम एस धोनी खेळताना दिसणार आहे. स्पर्धेतील पहिलाच सामना प्रतिस्पर्धी संघ मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. धोनीचे वय आता 43 वर्षे आहे. तसेच प्रत्येक हंगामानंतर तो निवृत्ती घेईल अशा अफवा पसरवल्या जात असतात. तत्पूर्वी आता त्याने आयपीएल स्पर्धेच्या त्याच्या भविष्याबाबत मोठा खुलासा केलेला आहे तो काय म्हणाला जाणून घ्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्याआधी जियो हॉटस्टारच्या एका शो मध्ये चर्चा करताना धोनीने त्याच्या भविष्याबद्दल भाष्य केले आहे. तो म्हणाला, मला जेवढ्या लांब काळापर्यंत वाटते तिथपर्यंत मी चेन्नईसाठी खेळू शकतो. हा माझा संघ आहे. मी जर व्हीलचेअर वर सुद्धा बसलेलो असेल तरीसुद्धा बाकीचे मला खेळण्यासाठी धरून आणतील.

चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने संघाच्या आशा जिवंत ठेवलेल्या आहेत की, महेंद्रसिंग धोनी या हंगामात संघासाठी महत्त्वपूर्ण पारी खेळेल. तसेच या हंगामात काही नवीन खेळाडूंना सुद्धा संघात सामील केले आहे. त्यामुळे कधी कधी धोनी प्रमाणे शॉट मारणे अवघड असते. यामुळे धोनीच संघामध्ये असणं मला आणि खेळाडूंना प्रेरणा देऊन जाते.

ऋतुराज गायकवाड पुढे म्हणाला, मला नाही वाटत की धोनी कधी त्यांच्या फॉर्म पासून वेगळे झालेले आहेत, किंवा त्यांची फिटनेस कधी कमजोर पडली आहे. जर तुम्ही सचिन तेंडुलकर यांना पाहिले तर ते सुद्धा 50 वर्षाच्या वयामध्ये खूप चांगली फलंदाजी करत आहेत. यामुळे मला वाटते की महेंद्रसिंग धोनी अजून खूप वर्ष खेळू शकतात.

एम एस धोनीने मागच्या हंगामात चेन्नईचे कर्णधार पद सोडून संघाची धुरा ऋतुराज गायकवाड कडे सोपवली. तसेच मागच्या हंगामामध्ये त्याने कोणत्याही दबावांमध्ये न येता 7 व्या आणि 8 व्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येऊन हंगामामध्ये 220 च्या तुफानी स्ट्राईक रेटने खेळत 161 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---