इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेविड मलान याने म्हटले आहे की, १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी पंजाब किंग्जकडून खेळण्याचा त्याचा निर्धार आहे. आयपीएलनंतर होणाऱ्या मोठ्या स्पर्धा, टी-२० विश्वचषक आणि एशेस मालिकेच्या बाबतीत तो नंतर विचार करणार आहे. सध्या तो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून नुकतेच लीड्स कसोटीत ७० धावांची धुव्वादार खेळी करत त्याने संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
जगातील अव्वल टी२० फलंदाज मलानने तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत भारताविरुद्ध इंग्लंडच्या पहिल्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत तो म्हणाला की, “आम्हाला माहीत नाही की, आम्ही विश्वचषक खेळू शकेल की नाही किंवा एशेस मालिकेचा भाग होईल की नाही.”
तो म्हणाला की, “आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी वचनबद्ध आहे. इतर सर्व शक्यता देखील आहेत. पण आत्ता काहीच सांगता येणार नाही.” मलानने कर्णधार जो रूटसोबत (१२१ धावा) तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावा जोडल्या होत्या. यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एशेस मालिकेत खेळण्याची शक्यता वाढली आहे.
तो म्हणाला की, “जरी मी सध्या क्रिकेटच्या सर्व विभागात चमकदार प्रदर्शन करत असलो, तरीही मी कोणतीही गोष्ट हलक्यात घेत नाही. जर काही कारणास्तव मी आयपीएलमधून बाहेर झालो आणि मग माझी इंग्लंडच्या कोणत्याही संघात निवड झाली नाही. तर कुठल्याच गोष्टीची हमी देता येणार नाही. त्यामुळे एशेस मालिकेला अजून बराच वेळ बाकी आहे. म्हणून मी या स्पर्धेत खेळायचे की नाही? याचा विचार नंतर करेल.”
आयपीएलचे दुसरे सत्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जवळपास दोन वर्षांनी यावर्षी भारतात पुन्हा आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे खळबळ उडाली आहे. म्हणून आयपीएलच्या हंगामाला मध्यंतरी थांबवावे लागले. आता ही लीग पुन्हा एकदा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा गाजवणारे ‘हे’ शिलेदार सीएसकेला चौथ्यांदा बनवणार विजेता!
सुरेश रैनाने एमएस धोनीला दिली ‘खास’ भेट; सीएसकेने शेअर केलेला फोटो व्हायरल
पुजाराच्या खेळीने ‘या’ खेळाडूचे वाढवले टेंशन; भारताकडून खेळण्यासाठी करावी लागणार आणखी प्रतिक्षा?