---Advertisement---

मोठी बातमी! श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लाहिरू थिरिमनेचा भीषण कार अपघात, अन्…

On: गुरूवार, मार्च 14, 2024 12:56 PM
---Advertisement---

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लाहिरू थिरिमनेचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अनुरादापुरा येथील थ्रीपेन येथे झालेल्या अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यानुसार, अपघातात किरकोळ जखमी झाल्याने त्याला अनुराधापुरा अध्यापन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबरोबरच  पोलिसांनी नमूद केले की थिरिमाने ज्या कारमधून प्रवास करत होता. ती कार आज सकाळी 07.45 च्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका लॉरीला जाऊन धडकली आहे. तसेच कारमध्ये प्रवास करणारे इतर तीन व्यक्ती, लॉरीचा चालक आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, पल्लेकेले येथील लीजेंड्स क्रिकेट ट्रॉफीमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून 11मार्चला लाहिरू थिरिमानेने 90 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला मिळालेला सामनावीराचा पुरस्कार त्याच्या कुटुंबाला त्याने समर्पित केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---