Team India Penalised: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सेंच्युरियन कसोटी सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. भारताला या सामन्यात एक डाव आणि 32 धावांनी पराभव पत्करला. मात्र, या पराभवानंतर आयसीसीने भारताला दुहेरी झटका दिला. षटकांची गती कमी राखल्यामुळे आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवातीच्या कसोटीत दोन षटके कमी टाकल्यामुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघाचे दोन महत्त्वाचे आयसीसी डब्ल्यूटीसी गुण कापले आहेत. तसेच, संघावर सामना शुल्काच्या 10 टक्के दंडही ठोठावला आहे.
आयसीसी एलिट पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांनी भारताला आव्हानापेक्षा दोन षटके मागे राहिल्यामुळे ही शिक्षा दिली आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आयसीसी आचार संहितेच्या कलम 2.22नुसार, जे किमान ओव्हर-रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे, खेळाडूंनी दिलेल्या वेळेत गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामना शुल्काच्या 5 टक्के दंड ठोठावला जातो.
🚨 JUST IN: India have been penalised for slow over rate during the first #WTC25 Test against South Africa.
Details ⬇️https://t.co/dSqixki92Z
— ICC (@ICC) December 29, 2023
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारत 16 गुण आणि 44.44 टक्क्यांसह पाचव्या स्थानी होता. मात्र, आता षटकांची गती कमी राखल्यामुळे भारत ऑस्ट्रेलियाच्या खाली 6व्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या खात्यात आता 38.89 टक्केवारीसह 14 गुण आहेत.
सामन्याचा आढावा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA Test) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. त्यानंतर यजमानांनी पहिल्या डावात फलंदाजी करताना 408 धावांचा डोंगर उभारला होता. तसेच, त्यांनी 163 धावांनी आघाडी घेतली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 34.1 षटकातच 131 धावांवर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. त्यामुळे हा सामना यजमान संघाने एक डाव आणि 32 धावांनी खिशात घातला.
भारतीय खेळाडूंचे प्रदर्शन
भारताकडून या सामन्यात केएल राहुल (KL Rahul) चमकला. त्याने पहिल्या डावात 101 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच, दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या डावात 5, तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. गोलंदाजीत भारताकडून जसप्रीत बुमराह चमकला. त्याने यजमानांची 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, तर मोहम्मद सिराज याने 2 विकेट्स घेतल्या. तसेच, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Big News India have been penalised for slow over rate during the first #WTC25 Test against South Africa)
हेही वाचा-
INDW vs AUSW: कर्णधार हरमनला खटकली टीम इंडियाची ‘ही’ गोष्ट, पराभवानंतर वाचून दाखवला चुकांचा पाढा
दोन्ही डावात मिळून 5 धावा करणाऱ्या कॅप्टन रोहितचे पराभवानंतर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘विरोधी संघाची ताकद…’