---Advertisement---

पाकिस्तानी क्रिकेटरने रेकॉर्ड्सबद्दल केले चक्क भेदभावाचे आरोप, चाहत्यांनी लक्षात आणून दिली चूक

Danish-Kaneria
---Advertisement---

Danish Kaneria Accused PCB: पाकिस्तान क्रिकेट आणि आरोप-प्रत्यारोप यांचे फारच जुने नाते आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनेक माजी खेळाडू त्यांच्या बोर्डावर आरोप करताना दिसतात. यामध्ये दानिश कनेरिया याच्या नावाचाही समावेश आहे. तो नेहमीच पीसीबीवर टीकास्त्र डागत असतो. आता त्याने पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पोल खोलली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भेदभावाचा आरोप लावला आहे. खरं तर, यापूर्वीही दानिश कनेरियाने पीसीबीवर भेदभावाचा आरोप लावला आहे.

खरं तर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांची एक यादी शेअर केली आहे. यामध्ये दानिश कनेरिया (Danish Kaneria) याच्या नावाचा समावेश नाहीये. अशात माजी खेळाडूने एक्स (पूर्वीचे ट्विटर) या हँडलवरून पोस्ट करत लिहिले की, “पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे धाडस तर पाहा. मी ऑस्ट्रेलियात 5 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या, पण त्यांनी माझे नाव यादीतून हटवले. माझ्यासोबतच्या भेदभावाचे ज्वलंत उदाहरण.”

https://twitter.com/DanishKaneria61/status/1738611647391162774?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738611647391162774%7Ctwgr%5E440bab332a0b17d8731ff223631e17efd86624eb%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.crictracker.com%2Flook-at-the-audacity-of-pcb-danish-kaneria-slams-at-pakistan-cricket-board%2F

कनेरियाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने कनेरियाची आकडेवारी शेअर करत म्हटले की, “मला वाटते, वरील यादी सरासरी आणि इकॉनॉमीच्या आधारावर आहे, भेदभावाविषयी नाही.”

https://twitter.com/hridaysingh16/status/1738647814924906643

यापूर्वीही कनेरियाने पाकिस्तान क्रिकेटवर भेदभावाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. कनेरियाने पाकिस्तानकडून 61 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने तब्बल 261 विकेट्स नावावर केल्या आहेत. याव्यतिरिक्त या माजी फिरकीपटूने 18 वनडे सामन्यात 15 विकेट्सही घेतल्या आहेत.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियातील दुसरा कसोटी
पाकिस्तान संघाविषयी बोलायचं झालं, तर ते सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उभय संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटीत त्यांना 360 धावांनी पराभवाचा धक्का बसला होता. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला जाईल.

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा विजय 1995मध्ये मिळवला होता. याव्यतिरिक्त पाकिस्तान संघ खेळाडूंच्या दुखापतीचाही सामना करत आहे. वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद आणि फिरकीपटू नौमान अली दुखापतीमुळे आधीच या मालिकेतून बाहेर पडले आहेत.

पाकिस्तान संघ-
शान मसूद (कर्णधार), सरफराज अहमद, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझ, सौद शकील, सलमान अली आगा, फहीम अशरफ, शाहीन शाह आफ्रिदी, आमिर जमाल, साजिद खान, अबरार अहमद. (big news look at the audacity of pcb danish kaneria slams at pakistan cricket board)

हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाची कर्णधार Alyssa Healy बनली फोटोग्राफर, पण घडली मोठी चूक; पत्रकार परिषदेत केला खुलासा
नवे सत्य जगासमोर! फक्त हार्दिकला ट्रेड करता यावे म्हणून मुंबईने मोजले तब्बल 100 कोटी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---