---Advertisement---

‘शाहिद आफ्रिदीने माझ्यावर इस्लाम धर्म…’, माजी पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक आरोप

ShahidAfridi
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक 2023 मध्ये खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या तीन सामन्यांत संघाला सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विश्वचषकादरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने हिंदू असल्यामुळे पाकिस्तानी संघातील खेळाडूंकडून भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. दानिश म्हणाला की, पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी त्याच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता.

आज तकला दिलेल्या मुलाखतीत दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो म्हणाला, “माझं करिअर खरंच चांगलं चाललं होतं. त्यावेळी मी काउंटी क्रिकेटही खेळत होतो. इंझमाम-उल-हक (Inzamam-Ul-Haq) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हे दोन खेळाडू मला नेहमीच साथ देत होते. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने मला खूप त्रास दिला आहे. आफ्रिदी आणि संघातील इतर खेळाडूंनी माझ्यासोबत जेवण केले नाही. शाहिद आफ्रिदीने माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.”

शाहिद आफ्रिदीशिवाय दानिश कनेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर मोठे आरोप केले आहेत. तो म्हणाला, “माझ्या काऊंटी क्रिकेटदरम्यान माझ्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. मी कबूल केले की मी फक्त एका बुकीला भेटलो होतो. पण त्यांनी माझ्यावर आरोप स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही मला पाठिंबा दिला नाही कारण मी हिंदू आहे. आफ्रिदीला भीती होती की मी खेळत राहिलो तर त्याचे विक्रम मोडेन.”

दानिश कनेरिया याने त्यांच्या हिंदुत्व आणि सनातन धर्माबद्दल बरेच काही सांगितले आहे. तो म्हणाला, “माझ्यासाठी माझा सनातन धर्म सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. मी काही चुकीचे बोलत नाही. काही चुकले तर मी आवाज उठवीन. पाकिस्तानमध्ये अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांची नोंदही झालेली नाही. मी माझ्या हिंदू समाजासाठी नेहमीच लढत राहीन.”

पाकिस्तान क्रिकेट संघाचा पुढील सामना 26 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत तर 3 सामने गमावले आहेत. (Shahid Afridi taught me Islam a shocking allegation by a former Pakistani player)

महत्वाच्या बातम्या 

‘मी तर त्याच दिवशी निवृत्त झालेलो, पण…’, 3 वर्षांनंतर धोनीचा गौप्यस्फोट, सांगितली Retirementची खरी तारीख

बलाढ्य इंग्लंडच्या नांग्या ठेचताच लंकन कर्णधाराने भरली हुंकार; म्हणाला, ‘आम्ही जर सलग 3 सामने…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---