अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील चॅलेंजर्स सामना शुक्रवारी (दि. 28 जुलै) एमआय न्यूयॉर्क विरुद्ध टेक्सास सुपर किंग्स संघात पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सचा फ्रँचायझी संघ एमआय न्यूयॉर्कने 6 विकेट्सने जिंकला. या विजयाचा शिल्पकार ट्रेंट बोल्ट ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह एमआय न्यूयॉर्क अंतिम सामन्यात पोहोचला. आता स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 30 जुलै) रोजी सिएटल ऑर्कस संघाविरुद्ध डलास येथे खेळला जाणार आहे.
या सामन्यात एमआय न्यूयॉर्क (MI New York) संघाचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याच्या संघसहकाऱ्यांनी अगदी योग्य ठरवला. यावेळी टेक्सास सुपर किंग्स (Texas Super Kings) संघाने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात सर्व विकेट्स गमावत 158 धावा केल्या. हे आव्हान न्यूयॉर्क संघाने 19 षटकात 4 विकेट्स गमावत 162 धावा करून पार केले. तसेच, सामना 6 विकेट्सने खिशात घातला.
The Men in Blue 💙 are FINALS BOUND @minycricket get their revenge and book their ticket 🎟️ in the MLC Championship🏆 #MLC2023 pic.twitter.com/XV8wHoYs0j
— Major League Cricket (@MLCricket) July 29, 2023
एमआय न्यूयॉर्क संघाचा डाव
एमआय न्यूयॉर्क संघाकडून फलंदाजी करताना डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने यावेळी 33 चेंडूत नाबाद 41 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर शायन जहांगीर याने 36 आणि टीम डेविड याने 33 धावांचा पाऊस पाडला. तसेच, कर्णधार निकोलस पूरनने 23, तर डेविड वीसने नाबाद 19 धावा केल्या.
यावेळी टेक्सास सुपर किंग्सकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांनी प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यश आले. त्यात डॅनियल सॅम्स, रस्टी थेरॉन, कॅल्विन सॅवेज आणि मोहम्मद मोहसिन याच्या नावाचाही समावेश आहे.
टेक्सास सुपर किंग्सचा प्रयत्न अपयशी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्स संघाचा मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. संघाकडून डेवॉन कॉनवे याने 38 धावांची सर्वोच्च खेळी साकारली. त्याच्याव्यतिरिक्त मिलिंद कुमार यानेही 37 धावा केल्या. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) हादेखील 6 धावांवरच तंबूत परतला. संघाचे 6 फलंदाज 10 धावांच्या आत तंबूत परतले.
यावेळी न्यूयॉर्क संघाकडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्ट (Trent Boult) भलताच चमकला. त्याने यावेळी 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त टीम डेविड याने 2 विकेट्स घेतल्या. तसेच, एहसान आदिल आणि राशिद खान यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (big news mlc 2023 mi new york went to final after texas super kings in challenger match read here)
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या गुडघ्याच्या सर्जरीविषयी पत्नी साक्षीची मोठी अपडेट; व्हिडिओ जोरदार व्हायरल
स्मिथ बाद की नाबाद? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण- व्हिडिओ