आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेशी संबंधित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार असे म्हटले जात आहे की, टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेचे ठिकाण बदलले जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजन वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे करण्याचे ठरले होते. मात्र, आता असे वृत्त समोर येत आहे की, ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. यूएसएमधील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हा निर्णय घेतला जाणार आहे.
वृत्तांनुसार, यूएसएला टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी ठिकाणे तयार करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच, ते यजमान म्हणून जिथे आहेत, ते आयसीसीला आवडले नाहीये. अशात आयसीसीने 2030च्या टी20 विश्वचषक स्पर्धेचे सह-यजमान असलेल्या इंग्लंडला 2024च्या टी20 विश्वचषकाचे आयोजन करण्याची विनंती केली आहे. (big news T20 World Cup 2024 Likely To Shift From USA And West Indies To England says Report)
अहवालात काय म्हटले?
एका न्यूज चॅनेलच्या अहवालात म्हटले गेले की, “सध्या एकच परिस्थिती आहे. यूएसमधील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती तितकी चांगली नाहीये. आयसीसी 2024 आणि 2030च्या स्पर्धेसाठी यजमानांची अदलाबादल करू शकते. त्यामुळे यूएस क्रिकेटलादेखील संधी मिळू शकेल. 2030 पूर्वी पायाभूत सुविधा सुव्यवस्थित करण्याची परवानगी यूएसए क्रिकेटला दिली जाईल. सध्या, ठिकाणे तयार करण्यासाठी ही खूपच घाऊक प्रक्रिया ठरेल. इंग्लंडला आधीच 2030 विश्वचषकचे यजमानपद दिले गेले होते आणि ते इतर राष्ट्रांप्रमाणेच जून-जुलैमध्ये एखाद्या स्पर्धेचे आयोजन करू शकतात.” हे वृत्त नेटवर्क 18ने दिले आहे.
असे असले, तरीही टी20 विश्वचषक 2030 स्पर्धेची ठिकाणे, जी इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंड येथे होती. ही ठिकाणे आता यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये हलवले जातील. टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी जागा बदलण्याच्या हालचालींमुळे यूएसएला स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळही मळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा खेळ 27 धावांचा, WTC Final मध्ये ‘हिटमॅन’ मोडेल का सेहवाग अन् सचिनचे रेकॉर्ड?
बिग ब्रेकिंग! साक्षी मलिकची कुस्तीपटूंच्या आंदोलनातून माघार? ट्वीट करत स्पष्टच म्हणाली…