क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील अखेरचा सामना 1 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या मालिकेनंतर उभय संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. अशात या मालिकेपूर्वीच मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) वेस्ट इंडिजचा टी20 संघ जाहीर करण्यात आला आहे. या 15 सदस्यीय संघात स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
दोन खेळाडूंचे पुनरागमन
वेस्ट इंडिज संघाने 2 दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा संघात संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघात अनुभवी फलंदाज शाय होप (Shai Hope) आणि वेगवान गोलंदाज ओशेन थॉमस (Oshane Thomas) यांचे पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडिज संघाचा वनडे कर्णधार असलेल्या शाय होपने अखेरचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना फेब्रुवारी 2022मध्ये खेळला होता. तसेच, थॉमस डिसेंबर 2021नंतर पहिल्यांदा खेळताना दिसेल.
West Indies name squad for Kuhl Stylish Fans T20I Series powered by Black and White
Full details here⬇️https://t.co/6bbvbPTLzo pic.twitter.com/pdEdC4jTvP
— Windies Cricket (@windiescricket) July 31, 2023
भारतीय संघाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व रोवमन पॉवेल (Rovman Powell) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, जेसन होल्डर, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि उपकर्णधार काईल मेयर्स या संघाचा भाग असतील. वेस्ट इंडिज संघ या वर्षी भारतात होणाऱ्या विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय करण्यात अयशस्वी झाला होता. अशात ही मालिका त्यांच्यासाठी पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेच्या तयारीसाठी मदत करेल. या स्पर्धेचे यजमानपद यूएसए आणि वेस्ट इंडिज संघ भूषवणार आहेत. ही स्पर्धा पुढील वर्षी जून-जुलै महिन्यात पार पडणार आहे.
टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ-
रोवमन पॉवेल (कर्णधार), काईल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रॉस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशेने थॉमस.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार ऍलिस्टर कूकचा खळबळजनक खुलासा! म्हणाल, ‘पुनरागमन करणार होतो, पण…’
मालिका खिशात घालण्यासाठी ब्रायन लारा स्टेडिअमवर उतरणार भारत अन् वेस्ट इंडिज; कोण कुणावर भारी? वाचाच