---Advertisement---

मालिका खिशात घालण्यासाठी ब्रायन लारा स्टेडिअमवर उतरणार भारत अन् वेस्ट इंडिज; कोण कुणावर भारी? वाचाच

Rohit-Sharma-And-Shai-Hope
---Advertisement---

तीन सामन्यांच्या वनेड मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यासाठी त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअम सज्ज झाले आहे. मंगळवारी (दि. 1 ऑगस्ट) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील हा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण, दोन्ही संघांनी मालिकेतील प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. अशात, मालिका जिंकण्यासाठी त्यांना आता फक्त एका विजयाची गरज आहे. दोन्ही संघ जबरदस्त प्रदर्शन करून सामना आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न करतील.

भारतीय संघाने या मालिकेची सुरुवात पहिला सामना जिंकून केली होती. या सामन्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला होता. तसेच, दुसऱ्या वनडेत विराट कोहली- रोहित शर्मा यांच्याशिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यजमान संघ मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकला. अशात हा सामना निर्णायक असणार आहे.

कोण कुणावर भारी?
वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या एकूण 44 वनडे सामन्यात उभय संघ आमने-सामने आले आहेत. यामध्ये भारताला 20 सामन्यात विजय, तर 21 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, उर्वरित 3 सामन्यांचा निकाल लागला नाहीये. अखेरचा सामना 29 जुलै, 2023 रोजी खेळला गेला होता. बार्बाडोसमधील या सामन्यात वेस्ट इंडिजने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

कुठे पाहता येईल सामना?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. हा सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल. याव्यतिरिक्त सामना मोबाईलवर जिओ सिनेमा ऍपवर पाहता येऊ शकतो.

कसे असेल हवामान?
ब्रायन लारा स्टेडिअम (Brian Lara Stadium) मैदानावर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वनडेतील हवामानाविषयी बोलायचं झालं, तर सामन्यादरम्यान ढगाळ आणि ऊन असे संमिश्र हवामान पाहायला मिळू शकते. येथील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सामन्यात पाऊस पडला, तर मालिका 1-1ने बरोबरीत सुटेल.

वनडे मालिकेसाठी उभय संघ
वेस्ट इंडिज

शाय होप (कर्णधार), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), ऍलिक अथानाजे, यानिक कारिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, काईल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडेन सिल्स, रोमॅरियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशन थॉमा.

भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार. (ind vs wi 3rd odi preview live streaming brian lara stadium records playing 11 take a look)

महत्त्वाच्या बातम्या-
कोणावर अन्याय तर कोणाला संधी! अशी आहे आयर्लंडविरुद्ध खेळणारी यंग इंडिया
सूर्या-हार्दिकला खरच विश्रांतीची गरज आहे का? आयर्लंड दौऱ्यातून घेतली माघार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---