---Advertisement---

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम

On: मंगळवार, मार्च 14, 2023 2:41 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्या नावावर केली. 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने नमवले. या पराभवानंतर चौथ्या कसोटीसाठी अहमदाबाद येथे उभय संघ आमने-सामने होते. दोन्ही संघांकडून चौथ्या कसोटीत वादळी फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र, चौथा कसोटी सामना अनिर्णित ठरला. यासह भारताने मालिका 2-1ने जिंकली. तसेच, न्यूझीलंडच्या श्रीलंकेवरील विजयामुळे भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले. चौथा कसोटी अनिर्णित राहिला असला, तरीही या कसोटीत भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात कधीही न घडलेला कारनामा पाहायला मिळाला. काय आहे तो कारनामा चला जाणून घेऊयात…

भारतीय संघाचा विक्रम
झालं असं की, ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूंनी शानदार झुंज दिली गेली. भारताच्या सर्वच फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. मात्र, भारतीय क्रिकेटच्या कसोटी इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की, जेव्हा भारतीय खेळाडूंनी सलग 6 वेळा 50 धावांहून अधिकची अर्धशतकी भागीदारी रचली. म्हणजेच, पहिल्या विकेटपासून ते सहाव्या विकेटपर्यंत सर्व फलंदाजांनी 50हून अधिक धावांची भागीदारी रचली.

भारतीय खेळाडूंनी केलेली भागीदारी पुढीलप्रमाणे
पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात 74 धावांची भागीदारी
दुसऱ्या विकेटसाठी शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात 113 धावांची भागीदारी
तिसऱ्या विकेटसाठी शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्यात 58 धावांची भागीदारी
चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यात 64 धावांची भागीदारी
पाचव्या विकेटसाठी विराट कोहली आणि केएस भरत यांच्यात 84 धावांची भागीदारी
सहाव्या विकेटसाठी विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यात 162 धावांची भागीदारी

अशाप्रकारे 6 वेळा 50हून अधिक धावांची भागीदारी रचत भारतीय संघाने या सामन्यात खास विक्रम रचला. खरं तर, भारताने ऑस्ट्रेलियाच्या 480 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या डावात 571 धावा केल्या होत्या. तसेच, 91 धावांची आघाडीही घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याडावात 2 विकेट्स गमावत 175 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.

विराट कोहलीचे शतक
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने 3 वर्षे 3 महिने आणि 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकले. विशेष म्हणजे, शतक ठोकल्यानंतरही विराटने शेवटपर्यंत झुंज दिली. त्याने यावेळी 364 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 186 धावा केल्या. या धावा करताना त्याने 15 चौकारही मारले. विशेष म्हणजे, विराटचे हे कसोटीतील 28वे शतक होते. तसेच, त्याला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारही मिळाला. हा त्याचा कसोटीतील 10वा पुरस्कार ठरला. (big record ind vs aus 4th test first time indian test cricket history 6 consecutive 50 plus run partnership read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाद थांबेना! इंदोर खेळपट्टीला ‘खराब’ म्हणणाऱ्या आयसीसीच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयचे मोठे पाऊल
पुढच्या 24 तासात इम्रान खान गजाआड जाणार? हेलिकॉप्टर घेऊन पोलीस लाहोरमध्ये दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---