Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुजाराला गोलंदाजी करताना पाहून संतापला अश्विन! म्हणाला, ‘मी काय…’

पुजाराला गोलंदाजी करताना पाहून संतापला अश्विन! म्हणाला, 'मी काय...'

March 13, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Cheteshwar Pujara bowling

Photo Courtesy: bcci.tv & Twitter/ashwinravi99


भारतीय संघाला अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात देता आली नाही. पण तरीदेखील बॉर्डर गावसरकर ट्रॉफी 2023 भारताच्या नावावर झाली. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सोमवारी (13 मार्च) अनिर्णित राहिला. विराट कोहली, शुबमन गिल आणि रविचंद्रन अश्विन या सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करू शकले. अश्विनने या सामन्यात सात विकेट्स घेतल्या असल्या तरीही गोलंदाजी सोडण्याचा विचार त्याच्या मनात आला आहे.

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin ) पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात एक विकेट घेऊ शकला. अश्विन आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या फिरकीपटूंनी यावर्षीची बॉर्डर गावसकर ट्रॉफी चांगलीच गाजवली. पण तरीदेखील कर्णधार रोहितने शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी चौथ्या कसोटीत गोलंदाजीसाठी आजमावले. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव सुरू होता. डावातील 77व्या षटकात रोहितने गिलला गोलंदाजीसाठी बोलावले. गिलच्या या षटकात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि मार्नस लाबुशेन फलंदाजी करत होते. या षटकात ऑस्ट्रेलियाला एक धाव मिळाला.

पुढच्याच षटकात रोहितने दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या हातात चेंडू सोपवला. पुजाराच्या या षटकात देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी एकच धाव घेतली. स्मिथ आणि लाबुशेन या दोघांनीही पुजाराच्या चेंडूचा सामना केला. पुढच्या षटकात रोहिने चेंडू पुन्हा गिलकडे सोपवला. पण ऑस्ट्रेलियाने गिलच्या या षटकातील फक्त एक चेंडू खेळल्यानंतर सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि स्टीव स्मिथ यांनी एकमताने सामना अनिर्णित करण्याचा निर्णय घेतला. रोहितने गिल आणि पुजाराला गोलंदाजी दिल्यानंतर रविचंद्रन अश्विनने मात्र मिश्किल प्रतिक्रिया दिली. अश्विनने पुजारा गोलंदाजी करतानाचा एक पोटो शेअर करत लिहिले की, “मी काय करू? जॉब सोडू का?”

Main kya karu? Job chod du? 😂 pic.twitter.com/R0mJqnALJ6

— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 13, 2023

अश्विनच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर खेळपट्टी फलंदाजीसाटी अनुकूल होती. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या, तर भारतीय संघाने प्रत्युत्तरात 571 धावांचा डोंगर उभा केला. भारताने 91 धावांची आघाडी घेतल्यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 175 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. (Spinner Ravichandran Ashwin shared a funny tweet after Cheteshwar Pujara became a bowler)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर
‘आम्ही एकमेकांशिवाय अपूर्ण…’, मालिकावीर अश्विन-जड्डूने गायले एकमेकांचे गुणगान, तुम्हीही कराल कौतुक


Next Post
Ravindra-Jadeja-And-R-Ashwin-Video

मालिकावीर पुरस्काराच्या 2.5 लाखांची अश्विन-जडेजाने केली चुकीची वाटणी? व्हिडिओ जोरदार व्हायरल

File Photo

आंतरमहाविद्यालयीन श्री शिवाजी मराठा आर्किटेक्चर क्रिकेट स्पर्धा । सिम्बायोसिस संघाचा रोमहर्षक विजय

Rohit Sharma

रोहितने सांगितला WTC फायनल जिंकण्याचा प्लॅन! म्हणाला, "आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143