---Advertisement---

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीचे संकट वाढले, ‘हा’ क्रिकेटपटू तीन सामन्यातून बाहेर?

On: मंगळवार, सप्टेंबर 29, 2020 4:34 PM
---Advertisement---

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विनला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने पंजाबविरुद्धच्या या सामन्यात एकच षटक टाकले होते. त्यानंतर झालेल्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता.

मंगळवारी सनराईझर्स हैदराबाद विरुद्ध होणाऱ्या सामन्यात चाहत्यांना त्याला गोलंदाजी करताना पाहायचं आहे. परंतु अश्विन सामन्यात पुनरागमन करेल का? याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. कारण त्याला झालेली जखम पाहिली तर तो इतक्या लवकर मैदानात येईल असं वाटत नाही.

किमान 2 ते 3 सामने नाही खेळणार
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या होणाऱ्या सामन्याच्या आदल्या दिवशी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने याबद्दल भाष्य केले आहे. त्याने स्पष्ट केले की, आर अश्विन किमान दोन किंवा तीन सामने खेळू शकणार नाही.

अशी झाली दुखापत
दिल्लीच्या पहिल्याच सामन्यात पंजाबचा विस्फोटक फलंदाज  ग्लेन मॅक्सवेलने मारलेला फटका रोखण्याचा प्रयत्न करत असताना अश्विनला दुखापत झाली होती. अश्विनसारखा दिग्गज फिरकीपटू फिट नसणे ही बाब  संघासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्याने पहिल्या सामन्यात 2 गडी बाद केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---