भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना सध्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. यानंतर भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध अजून आठ सामने खेळायचे आहेत आणि नंतर संघ आयर्लंडसाठी रवाना होणार आहे. आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पंड्या भारताचे नेतृत्व करणार, असे सांगितले जात होते. पण आता संघ व्यवस्थापन आपला निर्मय बदलण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज (INDvsWI) यांच्यातील कसोटी मालिकेसाठी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघात घेतले गेले नाहीये. पण वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत अष्टपैलू खेळाडू भारतीय जर्सीत दिसणार आहे. वनडे मालिकेत हार्दिक उपकर्णधार, तर टी-20 मालिकेत संघाचा कर्णधार आहे. 27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. त्यानंतर उभय संघातील पाच टी-20 सामन्यांची मालिका 3 ते 13 ऑगस्ट यादरम्यान खेळली जाईल. त्यानंतर भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. 18 ते 25 यादरम्यान भारत आणि आयर्लंड संघ आमने सामने असतील.
माध्यमांतील वृत्तांनुसार हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांना आयर्लंड दौऱ्यात विश्रांती दिली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकात हार्दिक पडंयाच्या भूमिका महत्वाची असणार आहे. अशात या दोन प्रमुख स्पर्धांसाठी संघ व्यवस्थापन पंड्याला फिट ठेवू इच्छित आहे. सूत्राच्या हवाल्याने सांगितले गेले आहे की, “अजून काही ठरलं नाहीये. हा निर्णया यावरही अवलंबून असेल की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेनंतर हार्दिकला कसे वाटते. त्याला यानंतर मोठा प्रवास करावा लागणार आहे. फ्लॉरिडावरून डबलिनचा प्रवास करण्याआधी दोन दिवस वेळ आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने कार्यभाराचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. विश्वचषकातही त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडायची आहे.”
दरम्यान, आयर्लंड दौऱ्यात जर हार्दिक पंड्याला विश्रांती दिली, तर नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सूर्यकुमार यादव आयर्लंडविरुद्ध कर्णधारपदासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Big update on Ireland tour, Captain contender Hardik Pandya will be left out of the team?)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । 34 वर्षीय विराटने खेळपट्टीवर दाखवली फिटनेस! यष्टीरक्षकावर छाप पाडण्यासाठी म्हणाला…
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराटने घडवला इतिहास! दिग्गजाला पछाडत ‘या’ खास विक्रमात पाचव्या स्थानी