भारतीय क्रिकेट बोर्डाने आज बिजू जॉर्ज यांची भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवे फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून घोषणा केली. हा संघ येत्या आयसीसी महिला विश्वचषकात भाग घेणार आहे.
ही नियुक्ती खास विश्वचषक ध्यानात घेऊन करण्यात आली आहे. सध्या मुख्य प्रशिक्षकाची जाबाबदारी तुषार आरोटे पार पाडत असून ट्रॅसी फेर्नांडिस या संघाचे फिजिओ आहेत.
राधा कृष्णमूर्ती यांची संघाचे ट्रेनर म्हणून तर रश्मी पवार यांची मसाजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरती नलगे यांची विडिओ विश्लेषक तर तृप्ती भट्टाचार्य यांची टीम मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघच सराव शिबीर मुंबई येथे होणार आहे.
हे शिबीर ६ जून ते १० जून या कालावधीत होईल.
भारतीय संघ ११ जूनला इंग्लंडला रवाना होईल तर १३ जूनला इंग्लंड विरुद्ध पहिला सराव सामना खेळेल. त्यानंतर १९ जूनला न्यूजीलँड, तर २१ जूनला श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ सराव सामने खेळेल.
महिला विश्वचषक २४ जून पासून इंग्लंड येथे सुरु होत असून याच आयोजन इंग्लंड आणि वेल्स बोर्डाने केलं आहे.