---Advertisement---

सीएसकेच्या चिंतेत वाढ! जोश हेजलवूडची माघार, ‘या’ दोन गोलंदाजांनी दिला खेळण्यास नकार

On: रविवार, एप्रिल 4, 2021 7:13 PM
---Advertisement---

आयपीएलचे १४ वा हंगाम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. अशातच सर्व संघांनी सरावाला देखील सुरुवात केली आहे. यंदा भारतात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना देखील आयपीएल भारतातच खेळवण्यात येणार आहे. अशातच काही दिवसापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा जलद गोलंदाज जोश हेजलवूडने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. आता सीएसके संघाच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.

जोश हेजलवूडने आयपीएल २०२१ खेळण्यास नकार दिला. त्यामुळे चेन्नई संघात एका खेळाडूची जागा रिकामी झाली आहे. ही जागा भरून काढण्यासाठी सीएसके संघाने काही खेळाडूंसोबत संपर्क करून पाहिला, पण त्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून भारतात येण्यास नकार दिला आहे. सीेएसके संघाचे पहिले ५ सामने मुंबईमध्ये होणार आहे आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

सीएसके संघाने जोश हेजलवूडची जागा भरून काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज बिली स्टेनलेक याच्यासोबत संपर्क साधला होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्याने भारतात येण्यास नकार दिला आहे. त्यानंतर त्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रीस टॉप्लीला देखील सीएसके संघातून खेळण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्याने देखील खेळण्यास नकार दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की,”संघाने अजून आस सोडली नाहीये, तसेच जोश हेजलवूडची जागा भरून काढण्यासाठी खेळाडूचे शोध घेणे सुरू आहे. ”

चेन्नईचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ : खतरनाक! पाकिस्तानी गोलंदाजाच्या चेंडूने टेंबा बवुमाच्या बॅटचे झाले चक्क दोन तुकडे

कोणावर करण्यात आले हत्येचे आरोप तर कोणी केली शेती; ‘हे’ आहेत आयपीएलनंतर कारकीर्द संपुष्टात आलेले १० क्रिकेटर्स

अजबच आहे हे तर! फटका चुकला, चेंडू स्टंपला लागला; पण तरीही क्विंटॉन डीकॉक नाबाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---