पाकिस्तान क्रिकेटमधील माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आणि पाकिस्ताननचे माजी पंतप्रधान आणि इम्रान खान यांचा आज (5 ऑक्टोबर) 70 वा वाढदिवस आहे. इम्रान खान यांनी क्रिकेट बरोबरच राजकारण, लेखक अशी विविध क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.
पाकिस्तानचा यशस्वी कर्णधार असणारा आणि पाकिस्तानला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार इम्रान खानबद्दल या खास गोष्टी-
-5 ऑक्टोबर 1952 ला इम्रान खान यांचा लाहोर येथे जन्म झाला.
-त्यांचे पूर्ण नाव अहमद खान नियाझी इम्रान असे आहे.
-त्यांचे शालेय शिक्षण एचिसन कॉलेज, लाहोर आणि इंग्लंडमधील रॉयल ग्रामर स्कुल वॉर्सिस्टर येथून झाले आहे. तसेच पदवीचे शिक्षण केब्ले कॉलेज, ऑक्सफोर्ड येथून झाले असून येथे त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
-इम्रान यांनी लाहोरमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. क्वायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये ते 1969 मध्ये लाहोर अ संघाकडून सरगोधा विरुद्ध खेळले. या पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी 30 धावा आणि 43 धावांत 2 विकेट्स घेतल्या.
-याबरोबरच त्यांनी ऑक्सफोर्ड युनीवर्सिटी ब्ल्यू, वोरस्टरशायर, ससेक्स आणि न्यू साउथ वेल्स संघाचेही प्रतिनिधित्व केले आहे.
– ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज डेनिस लीली हे इम्रान खान यांचे आदर्श होते.
On @ImranKhanPTI's birthday, revisit the moment he sealed them the 1992 @cricketworldcup title and lifted the trophy! 🇵🇰 🏆 pic.twitter.com/LzBtfu06A0
— ICC (@ICC) October 5, 2018
-इम्रान खान यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 22.32 च्या सरासरीने 1287 विकेट्स तर 36.79 च्या सरासरीने 17771 धावा केल्या आहेत.
-इम्रान यांनी 1971 मध्ये 3-8 जून दरम्यान झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात त्यांना एकही विकेट घेता आली नाही. पण फलंदाजी करताना त्यांनी 5 धावा केल्या.
#OnThisDay 1971 – Pakistan all-rounder @ImranKhanPTI made his Test debut against England at Edgbaston pic.twitter.com/SGzEjijj69
— ICC (@ICC) June 3, 2016
-1982 च्या मोसमात त्यांनी 9 कसोटी सामन्यात तब्बल 62 विकेट्स घेतल्या.
-त्यांनी कसोटीत 3000 धावा आणि 300 विकेट्सचा टप्पा 75 व्या कसोटी सामन्यात पार केला. सर्वात जलद हा टप्पा गाठणारे ते दुसऱ्या क्रमांकाचे अष्टपैलू खेळाडू ठरले होते.
-त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी 88 कसोटी सामन्यात 3807 धावा आणि 362 विकेट्स तर वनडेत 175 सामन्यात 3709 धावा आणि 182 विकेट्स घेतल्या आहेत.
-त्यांनी पाकिस्तानचे 48 कसोटी आणि 139 वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे.
He scored 3807 runs and took 362 wickets in Test cricket!
3709 runs and 182 ODI wickets and was Pakistan's 1992 World Cup winning captain 👏
Happy birthday Imran Khan! pic.twitter.com/T0YP7to5hP
— ICC (@ICC) October 5, 2019
-1992 चा विश्वचषक पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली जिंकला. या विश्वचषकानंतर इम्रान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आणि राजकारणात प्रवेश केला.
-1992 च्या विश्वचषकाआधी त्यांनी 1987 नंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती पण पाकिस्तानचे मिलिटरी डायरेक्टर झिया उल हक यांनी इम्रान यांना पाकिस्तानचे कर्णधारपद स्विकारण्यासाठी विचारले. त्यानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा इम्रान यांनी पुनरागमन केले.
-इम्रान हे क्रिकेटपटू बरोबरच राजकारणी आणि लेखक आहेत. त्यांनी 6 पुस्तकांचे लेखण केले आहे.
-त्यांच्या आईचे निधन कर्करोगाने झाल्याने त्यांनी आईच्या स्मरणार्थ 29 डिसेंबर 1994 ला शौकत खानम मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना केली.
-याबरोबरच त्यांनी नमल कॉलेजचीही मियांवाली जिल्ह्यात स्थापना केली.
-1996 मध्ये त्यांनी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाची स्थापना केली.
-2010 मध्ये त्याच्यावर आधारीत पाकिस्तान प्रोडक्शन हाउसने ‘कप्तान: मेकिंग ऑफ लिजंड’ हा चरित्रपट केला.
-त्यांनी 1995 ला जेमिमा गोल्डस्मिथबरोबर विवाह गेला. मात्र 2004 मध्ये त्यांचा घटस्पोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी पत्रकार रेहम खान यांच्याबरोबर विवाह केला. पण 10 महिन्यातच त्यांचाही घटस्पोट झाला.
-इम्रान यांना ऑक्सफोर्ड युनीवर्सिटीचा हॉल ऑफ फेम्स पुरस्कार मिळाला आहे.
-1985 मध्ये ससेक्स क्रिकेट सोसायटीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार आणि 1992 ला पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलल-इ-इम्तियाझ या पुरस्काराने इम्रान यांचा गौरव झाला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या दादा चमकला! मालिकावीर बनत पटकावले विराट- रोहितच्या खास यादीत स्थान, तुम्हालाही वाटेल अभिमान
टी20त आव्हानाचा पाठलाग करताना घरच्या मैदानावर पाचव्यांदा झालीय टीम इंडियाची गाडी पंक्चर, पाहा आकडेवारी