महिला विश्वचषक २०२२ (Womens World Cup 2022) नुकताच सुरु झाला आहे. भारतीय संघ पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध (India Pakistan World Cup Match) खेळला. हा सामना ६ मार्चला खेळवला गेला. या सामन्यापूर्वी पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफ भारताविरुद्धचा सामना खेळण्यासाठी आपल्या मुलीसह हजर झाली होती. आयसीसीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या संघासोबत जात असताना तिच्या हातात तिचं लहान बाळसुद्धा दिसत आहे.
मागील वर्षी मारुफ आई झाली आहे. ती या पूर्ण विश्वचषकादरम्यान आपल्या ७ महिन्याच्या मुलीसोबत दिसणार आहे, तसेच तिची आई बाळाची देखभाल करण्यासाठी सोबत असणार आहे. हा फोटो सोशल मिडीयावर तूफान व्हायरल होत आहे.
पाकिस्तानची महिला कर्णधार आपल्या प्रेग्नंसीमुळे क्रिकेटला निरोप देणार होती, परंतु लोकांच्या सांगण्यावरुन यावर्षी विश्वचषक खेळण्याचा निर्णय घेतला. आई झाल्यानंतरसुद्धा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मारुफने पाकिस्तान क्रिकेटला चालना दिली आहे. प्रत्येकजण मारुफला (Bismah Maroof) स्टार मानू लागले आहे. पाकिस्तानची महिला कर्णधार फक्त पाकिस्तानचीच नव्हे, तर संपुर्ण जगाची प्रेरणा बनली आहे. तिच्या या कामगिरीचे जगभरातून कौतुक केले जात आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1500280142979080192
रविवारी (६ मार्च) न्यूझीलंडमधील माउंट मौनगानुई येथे भारत-पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यात भारताने १०७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, भारतीय संघाची महिला कर्णधार मिताली राजने भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनप्रमाणे मितालीसुद्धा ६ विश्वचषकात भाग घेणारी भारतीय खेळाडू बनली आहे. मिताली राजचा हा सहावा विश्वचषक आहे. सचिन तेंडूलकरने देखील ६ विश्वचषक खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज
‘शेन वॉर्नने मला मोठा मंच उपलब्ध करून दिला’, नाबाद १७५ धावा ठोकल्यानंतर ‘रॉकस्टार’ जडेजा भावुक
क्या बात! पुन्हा एकदा भारतापुढे पाकिस्तानला टेकावे लागले गुडघे, १०० टक्के विजयाचा रेकॉर्ड अबाधित






