---Advertisement---

क्रिकेटपटू नाही तर ‘या’ फुटबॉलपटूने RCB संघात निवड न झाल्याने ट्विटरवर व्यक्त केली नाराजी

---Advertisement---

आयपीएलचा १३ वा हंगाम संपून २ महिनेच उलटत नाहीत, तर आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगुल वाजले आहेत. बुधवारी (२० जानेवारी) सर्व आयपीएल फ्रँचायझींनी आयपीएल २०२१ च्या हंगामाच्या लिलावाआधी संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू हॅरी केनने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

यंदाच्या हंगामासाठी विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लिलावाआधी केवळ १२ खेळाडूंना संघात कायम केले आहे, तर एकूण १० खेळाडूंची संघातून मुक्त करण्यात आले आहे. याबाबत आरसीबीने ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर हॅरी केनने गमतीशीर प्रतिक्रिया दिली की ‘संघान निवड न झाल्याने थोडा नाराज झालो. पण आता काही करु शकत नाही. तुम्हाला मी यानंतरही प्रोत्साहन देत राहिल.’

हॅरी केन आरसीबीचा फॅन – 

खरंतर हॅरी केन हा फुटबॉलपटू जरी असला तरी तो क्रिकेटचा देखील चाहता आहे. तसेच तो भारतीय संघाचा प्रशंसकही आहे. त्याच्यात आणि भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीमध्ये चांगली मैत्री देखील आहे. त्यामुळे त्याने काही महिन्यांपूर्वी स्वत: क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ पोस्ट करत त्याला आरसीबी संघात घेण्याबद्दल मजेने विचारले होते.

त्यावर विराटने उत्तर दिले होते की ‘छान खेळलास मित्रा, तू काऊंटर ऍटॅकींग फलंदाज म्हणून खेळू शकतोस.’

लिलावाआधी आरसीबीने या १२ खेळाडूंना केले संघात कायम –

आरसीबीने संघात कायम केलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन आणि पवन देशपांडे यांचा समावेश आहे. तरमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये मोईन अली, शिवम दुबे, गुरकिरत सिंग मन, ऍरॉन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, इसरु उडाना आणि उमेश यादव यांचा समावेश आहे. तर पार्थिव पटेल निवृत्त झाल्याने आणि डेल स्टेन उपलब्ध नसल्याने संघातून मुक्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर कशी केली टीम इंडियाने ऑसींवर मात?, विहारीने केला खुलासा

कर्णधारपदासाठी वॉर्नरवर आजीवन आणि स्मिथवर केवळ २४ महिन्यांचीच बंदी का? दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

“पंचांनी आम्हाला मैदान सोडण्याचाही पर्याय दिला होता, पण…”, मोहम्मद सिराजने उलगडला सिडनीतील वर्णद्वेषी शेरेबाजी प्रकरणाचा घटनाक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---