भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या लग्नाच्या कारणामुळे चर्चेत आहे. त्याचा विवाह स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत रंगणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. यापूर्वी त्याचा विवाह दक्षिण भारतीय अभिनेत्री अनुपमा हिच्यासोबत होणार असल्याच्या अफवांना उधाण आले होते. अशातच, बॉलिवुड अभिनेत्री तारा शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत बुमराह आणि संजना यांच्या विवाहाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे.
बुमराहने नुकतेच, तारा शर्माचा शो ‘द तारा शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये बुमराहने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. शोच्या समाप्तीच्या वेळी ताराने आभार मानत त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ताराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बुमराहसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिने लिहले आहे की, ‘जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन तुमचा विवाह होत असल्यामुळे हार्दिक शुभेच्छा. आमच्यातर्फे खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. द तारा शोमध्ये आल्याबद्दल खूप धन्यवाद. आम्ही सिजन २ मध्ये तुम्ही दोघे सोबत यावे अशी आशा व्यक्त करतो.’
https://www.instagram.com/p/CMP2389Mpp1/?utm_source=ig_web_button_share_sheet
ताराने ही पोस्ट शेअर करत बुमराह आणि संजना यांच्यातील विवाह होण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. परंतु याबाबतची अधिकृत माहिती येणे बाकी आहे. मात्र ताराने शेअर केलेल्या या पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांना आनंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बुमराहची होणारी पत्नी कोण हा प्रश्न सर्वांना पडला होता? आता या पोस्टने सर्वांच्या प्रश्नांना उत्तर मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉक्सिंग जगताला मोठा धक्का! ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्विन हेगलरचे निधन
केवळ ४ धावांनी अर्धशतक हुकलेल्या जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग, पाहा व्हिडिओ
अर्धशतक करण्याआधी ‘या’ घटनेमुळे विराट कोहली झाला ट्रोल, पाहा व्हिडिओ