बॉलिवूड आणि क्रिकेट यांचे नाते फार जुने आहे. अनेक सुप्रसिध्द बॉलीवुड अभिनेत्री भारताच्या स्टार क्रिकेटपटूंसोबत विवाहबंधनात अडकलेल्या आहेत. लग्नानंतर मात्र अनेक अभिनेत्रींनी बॉलिवुडमधून काढता पाय घेतला आहे. आपण या लेखात बघणार आहोत अशा 5 अभिनेत्री ज्यांनी भारतीय क्रिकेटपटूंसोबत विवाह केल्यानंतर अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला.
1)सागरिका घाटगे
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असलेल्या झहीर खानने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत लग्न केले होते. त्याच वर्षी सागरिका तिच्या शेवटचा चित्रपट ‘इरादा’ मध्ये दिसली होती. यानंतर सागरिकाने आपल्या अभिनय कारकिर्दीचा निरोप घेतला होता. सागरिकाने बॉलीवुडचा बादशहा शाहरुख खान याच्या सुपरहिट ठरलेल्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटामध्ये देखील काम केले होते.
2)संगीता बिजलानी
भारताचा माजी दिग्गज कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 1996 साली आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. यानंतर त्याने आपले दुसरे लग्न बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी केले होते. अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संगीताने त्यावर्षी निर्भयमध्ये शेवटची भूमिका केली होती. यानंतर ती पुन्हा कधी मोठ्या पडद्यावर दिसली नाही. 2010 मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला.
3)हेजल कीच
बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीचने 2016 मध्ये भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगसोबत लग्न केले होते. हेजलला अखेरचे 2016 मध्ये क्रेझी बरात या सिनेमात बघितले गेले होते. लग्नानंतर हेझेल पुन्हा कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. हेझलने सलमान खानबरोबर 2011 मध्ये बॉडीगार्ड या सुप्रसिध्द चित्रपटात काम केले होते.
4)गीता बसरा
दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने 2015 मध्ये अभिनेत्री गीता बसराशी लग्न केले होते. गीता देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने लग्नानंतर तिच्या अभिनय कारकीर्दीला रामराम ठोकला. भज्जी आणि गीताने 8 वर्ष एकत्र राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता. गीताने 2016 मध्ये पंजाबी चित्रपट ‘लॉक’ मध्ये काम केले होते.
5)नताशा स्टॅनकोविच
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांनी 2020 साली लॉकडाउनमध्ये लग्न केले होते. नताशाने बर्याच हिट गाण्यांवर डान्स केला आहे आणि 2014 मध्ये आलेल्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हार्दिक सोबत लग्न केल्यानंतर ती कोणत्याही गाण्यात किंवा चित्रपटात दिसलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज, ‘या’ भारतीय खेळाडूंचा आहे दबदबा
आनंदाची बातमी! ‘मिस्टर क्रिकेट’ हसीची कोरोनावर यशस्वी मात; सुखरुप पोहचला आपल्या घरी






