बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 ऑस्ट्रेलिया संघासाठी खूपच खराब ठरताना दिसत आहे. आधी नागपूर आणि नंतर दिल्ली अशा दोन्ही कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. दोन सामने संपताच ऑस्ट्रेलियाचे जवळपास अर्धा डझनभर खेळाडू तिसऱ्या कसोटीपूर्वीच मायदेशात परतले आहेत. यामधील एक नावे डेविड वॉर्नर याचेही आहे. वॉर्नरला दुसऱ्या कसोटीदरम्यान खेळताना कोपराची दुखापत झाली होती. त्यामुळे तो या दौऱ्यातून बाहेर झाला आहे. अशात, त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) हा ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. तसेच, त्याने या दौऱ्यातून बाहेर पडण्याचे दु:खही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मांडले आहे. ऑस्ट्रेलिया संघाला या कसोटी मालिकेत पुनरागमन करणे खूपच कठीण असल्याचे दिसत आहे. कारण, कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) हादेखील मायदेशी परतला आहे. कमिन्सची आई गंभीर आजारी असल्यामुळे तो तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
डेविड वॉर्नर इंस्टाग्राम पोस्ट
अशात वॉर्नरने इंस्टाग्रामवर (David Warner Instagram Post) या दौऱ्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दुखापतग्रस्त झाल्यामुळे या दौऱ्यातून बाहेर पडण्याचे आणि ज्या आठवणी नको होत्या त्याचेही खूप दु:ख आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. दिल्ली कसोटीचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही, परंतु आता 2 कसोटी सामने बाकी आहेत. तसेच, मला आशा आहे की, आम्ही लवकरच पुनरागमन करू.”
https://www.instagram.com/p/CpCJPL3LI9n/?utm_source=ig_embed&ig_rid=3343f86d-8dc6-46ee-9095-d6c8465f5b95
वॉर्नरने केला खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना
याच दौऱ्यावर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता, तेव्हापासूनच वॉर्नरच्या फॉर्मविषयी चर्चांनी जोर धरला होता. यानंतर नागपूर कसोटीत जेव्हा वॉर्नर दोन डावांमध्ये 1 आणि 10 धावांवर बाद झाला, तेव्हा त्याला दिल्ली कसोटीतून वगळण्याचीही चर्चा सुरू होती.
यानंतर दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 15 धावा केल्या. मात्र, दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला सामन्यात पुढे खेळता आले नाही. अशात आता वॉर्नर या दौऱ्यातून बाहेर पडल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच, त्याच्या भविष्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (border gavaskar trophy 2023 sad to leave the tour injured australia david warner reaction after returning home read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बीसीसीआयने तुम्हाला समान मानधन दिले, तरीही तुम्ही…’, हमरनसेनेवर भडकल्या भारताच्या माजी कर्णधार
मोठी बातमी! न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेने निवडला भक्कम संघ, WTCच्या फायनलवर डोळा