---Advertisement---

…तर कॅप्टन कोहली करणार तो विश्वविक्रम

On: रविवार, फेब्रुवारी 2, 2020 11:14 AM
---Advertisement---

शुक्रवारी (31 जानेवारी) स्काय स्टेडियम (Sky Stadium) येथे भारताने न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) चौथा टी20 सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. हा सामना जिंकत भारताने मालिकेत 4-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एक विक्रम (Record) करण्याची संधी आहे.

भारताने विराटच्या नेतृत्वात 2019 वनडे विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात एकही मालिका गमावली नाही. जर भारताने आजचा टी20 सामना जिंकला तर विराटच्या नावावर एक विक्रम होईल.

विराटने भारताचे नेतृत्व करत न्यूझीलंडमध्ये आजचा सामना जिंकला तर तो न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात सर्वाधिक सामने जिंकणारा परदेशी कर्णधार बनेल.

विराटबरोबरच इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने (Eoin Morgan) आपल्या नेतृत्वात टी20मध्ये न्यूझीलंडला चार वेळा पराभूत केले आहे. याचा अर्थ विराट आणि मॉर्गन हे दोन्हीही कर्णधार संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहेत. परंतु, जर आजचा टी20 सामना भारताने जिंकला तर तो मॉर्गनला मागे टाकेल.

त्याचबरोबर यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 5 सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळली नव्हती. विराटने आज होणाऱ्या अंतिम सामन्यात जर न्यूझीलंडचा व्हाईट व्हॉश दिला तर तो भारतासाठी 5 सामन्यांची टी20 मालिका जिंकणारा पहिला कर्णधार बनेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---