---Advertisement---

विराटने भन्नाट थ्रो करत कॉलिन मुन्रोला केले धावबाद, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जानेवारी 31, 2020 7:50 PM
---Advertisement---

वेलिंग्टन । आज (31 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना येथे पार पडला. तिसऱ्या टी20 सामन्याप्रमाणे आजचा सामनाही भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. हा सामना जिंकत भारताने मालिकेत 4-0 अशी आघाडी (4-0 Lead In T20 Series) घेतली आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. न्यूझीलंड संघाकडून फलंदाजी करत असताना कॉलिन मुन्रोला (Colin Munro) विराटने धावबाद केले.

झाले असे की, भारताच्या 165 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून मुन्रो 64 धावांवर फलंदाजी करत होता. यावेळी शिवम दुबे 12 व्या षटकात गोलंदाजी करत होता. तेव्हा या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मुन्रोने स्वीप कव्हरच्या दिशेने फटका मारला आणि 1 धाव घेतली.

परंतु तो दुसरी धाव घेत असताना शार्दुल ठाकूरने चेंडू पकडला तो स्टंपकेडे फेकला. यावेळी शॉर्ट कव्हरला उभ्या असणाऱ्या विराटने मधे येऊन चेंडू पकडला आणि स्ट्राईकर एंडवर फेकला. तो चेंडू थेट जाऊन स्टंपला लागला. त्यामुळे मुन्रो धावबाद झाला.

विराटने मुन्रोला बाद केल्यानंतर बीसीसीआयने विराट आणि मुन्रोचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

त्याचबरोबर एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले की, “पुन्हा सुपर ओव्हर. विराटने उत्कृष्ट धावबाद केले.”

https://twitter.com/Satheesh_2017/status/1223197591187230721

या सामन्यात मुन्रोने 47 चेंडूत 64 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना  प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या आणि न्यूझीलंडला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे या सामन्यात बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी 1 बाद 13 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 14 धावांचे आव्हान होते. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने (KL Rahul) फलंदाजी केली. यावेळी भारताकडून केएल राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे भारताला शेवटच्या चार चेंडूत 4 धावांची गरज होती.

पण तिसऱ्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---