---Advertisement---

विराटला नक्की झालंय तरी काय? बुमराहपाठोपाठ भज्जीचीही करतोय नक्कल

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 7:11 PM
---Advertisement---

मंगळवारी (7 जानेवारी) इंदोर येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात (2nd T20 Match) भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगच्या (Harbhajan Singh) गोलंदाजीची नक्कल केली केली आहे.

या सामन्यापूर्वी विराटला हरभजनसिंगची नक्कल करण्यास सांगितले असता त्यानेही ते व्यवस्थित केली. त्याचबरोबर त्याने हरभजन चेंडू टाकल्यानंतर कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो हेही सांगितले. विराटने हरभजनची नक्कल करून दाखवल्यानंतर डोक्यावर दोन्ही हाथ ठेऊन त्याच्या नेहमीच्या उभे राहण्याच्या स्टाईलचीही नक्कल केली.

याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

या व्हिडिओत विराट हरभजनची नक्कल करताना दिसतोय.

विराट हरभजनची नक्कल करत असताना हरभजन म्हणाला की, “होय मला माहिती आहे की तुम्ही मला या ठिकाणी कशासाठी बोलावले आहे. कारण, जेव्हा विराट माझी नक्कल करेल तेव्हा मी त्याला पाहील की तो कशाप्रकारे माझी नक्कल करतोय.”

त्यानंतर विराट आणि हरभजनने एकमेकांशी हात मिळवला. त्यानंतर दोघांमध्ये गप्पागोष्टी झाल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---