---Advertisement---

भुर्रर्रर्र! विकेट मिळाल्यावर गोलंदाजाचे हटके सेलिब्रेशन, चालवली मोटारसायकल

On: सोमवार, जून 14, 2021 3:29 PM
---Advertisement---

आयपीएल २०२०१चे उर्वरित सामने सुरू होण्यास अजून तीन महिने अवधी शिल्लक असून, त्याआधी युएईत पाकिस्तान सुपर लीगला पुन्हा सुरुवात झाली आहे. पीएसएलच्या या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडू धावांचा पाऊस पाडताना आणि बळी मिळवताना दिसून येतात. असाच एक रोमांचकारी सामना शनिवारी क्वेटा ग्लॅडीएटर आणि पेशावर जाल्मि या संघांदरम्यान बघायला मिळाला.

झाले असे की, पेशावर जाल्मि संघाने फलंदाजी करताना प्रथम 20 षटकात 197 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर संघ पेशावर संघाच्या गोलंदाजीसमोर अडखळताना दिसला. कर्णधाराने आठवे षटक फॅबियन एलेनला सोपवले. त्याला याची शंका नव्हती की, तो मोठा बळी मिळवणार आहे.

षटकातील अंतिम चेंडू टाकण्याऱ्या फॅबियनच्या चेंडूवर क्वेटाचा सलामीवीर उस्मान खानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सीमारेषेवर तैनात असलेल्या शोएब मलिकने त्याचा झेल टिपला. या झेलवर गोलंदाज फॅबियन एलनने वेगळ्याच अंदाजात आनंद साजरा केला, जसा की तो मोटरसायकल चालवित आहे. त्यानंतर तो नाचायला लागला. फॅबियनचा हा आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पॅबियनने या सामन्यात एकच षटक टाकले, ज्यात त्याने 8 धावा देऊन एक महत्त्वाचा बळी घेतला. मोहम्मद इरफानने 4 षटकात 27 धावा देऊन 3 बळी, कर्णधार वहाब रियाझने 4 षटकात 20 धावा देऊन 2 बळी, उमेर आसिफने 3 षटकात 17 धावा देऊन 2 बळी टिपले. हा सामना पेशावर जाल्मि संघाने 61 धावांनी जिंकला. या विजयामुळे पेशावर जाल्मि संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यानंतर तिथेच इंडिअन प्रीमिअर लीग स्पर्धा सप्टेंबरमध्ये सुरु होत असून आयपीएल चाहते देखील स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. 29 सामन्यांनंतर स्थगित झालेली आयपीएल पुन्हा सुरू होणार असून यात कोणता संघ बाजी मारेल? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अवघ्या ८ चेंडूत युएईत आणलं वादळ, पीएसएलच्या एका सामन्यात सुपरस्टार बनला ‘हा’ पठ्ठ्या

मन जिंकलस! आफ्रिदीच्या जावयाची खेळाडू वृत्ती, बाद झालेल्या फलंदाजाचा ‘असा’ वाढवला उत्साह

किवींसाठी धोक्याची घंटा! कसोटी चॅम्पियनशीपच्या लढतीपुर्वी इंग्लंडमध्ये ‘सर जडेजा शो’चे दर्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---