इंडियम प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजेच युएईत खेळला जात आहे. या स्पर्धेने २०२० मधील अर्धा प्रवास पार केला आहे. परंतु एकामागून एक दुखापतग्रस्त होणाऱ्या खेळाडूंची मालिका अजूनही सुरूच आहे. या हंगामात, बरेच खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत, त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आहे. तो या हंगामातून बाहेर पडला आहे.
आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाकडून गेल्या दोन हंगामात खेळत असलेला इशांत शर्मा या हंगामात दुखापतग्रस्त झाला आहे. इशांत शर्माच्या दुखापतीमुळे यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाला त्रास सहन करावा लागणार आहे. अखेर दुखापतीमुळे त्याने या हंगामातून माघार घेतली आहे. इशांत शर्मा या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ लवकरात लवकर त्याची जागा भरून काढेल.
दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजांपैकी भारताचे वेगवान गोलंदाज अद्यापही तितकेसे प्रभावित करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत हे ३ खेळाडू जे दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये इशांत शर्माच्या जागी पर्याय म्हणून खेळू शकतात.
दिल्ली कॅपिटल्स संघाकडे इशांत शर्माच्या जागी हे तीन पर्याय आहेत
कुलवंत खेजरोलिया
युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाजांची भारतामध्ये कमतरता नाही. गेल्या काही वर्षांत भारतातील वेगवान गोलंदाजांमध्ये अनेक नावे समोर आली आहेत. त्याचप्रमाणे दिल्लीचा वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलियानेही आपल्या कामगिरीने प्रभावित करून आयपीएलमध्ये स्थान मिळवले. कुलवंत खेजरोलिया मुंबई इंडियन्स आणि आरसीबीच्या संघामध्ये दिसला आहे. पण यावेळी तो कोणत्याही संघात उपस्थित नाही. त्याला आरसीबीने सोडल्यानंतर इतर कोणीही लिलावात विकत घेतले नाही. कुलवंत खेजरोलियाला पुन्हा संधी आहे. कारण दिल्ली कॅपिटल्सचा संघ इशांत शर्माच्या बदलीचा विचार करीत आहे.
बरिंदर स्त्रान
बरिंदर स्त्रान आयपीएलमध्ये बर्याच संघांकडून खेळला आहे, पण यावेळी त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. म्हणून तो या हंगामात खेळताना दिसत नाही. बरिंदर स्त्रान पुन्हा एकदा आयपीएलचा भाग होताना दिसू शकतो. इशांत शर्माच्या जागी दिल्ली कॅपिटल्समध्ये त्याचा समावेश होऊ शकतो.
विनय कुमार
भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला अनुभवी वेगवान गोलंदाज विनय कुमारला या आयपीएल हंगामात कोणत्याही फ्रँचायझीने आपल्या संघात घेतले नाही. विनय कुमार आयपीएलमध्ये बरीच वर्षे खेळला आहे तसेच भारताकडूनही खेळत होता. त्याने आश्चर्यकारक गोलंदाजीही केली आहे. परंतु आता तो कोणत्याही संघाचा भाग नाही. परंतु त्याला पुन्हा जागा मिळवण्याची संधी आहे. इशांत शर्माच्या जागी दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये विनय कुमारचा विचार केला जाऊ शकतो. युएईमध्ये ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, ते पाहता विनय कुमार देखील एक चांगला गोलंदाज असल्याचे सिद्ध होऊ शकते.
ट्रेंडिंग लेख-
-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
-असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्स संघाला मिळवून देऊ शकतात पहिले आयपीएल विजेतेपद
-मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
महत्त्वाच्या बातम्या-
-“१०० मीटरपेक्षा लांब षटकार ठोकल्यास द्याव्या अतिरिक्त धावा” – केएल राहुल
-दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट
–Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय