---Advertisement---

पत्रकारांना तोंड देण्याची वेळ माझ्यावर का? पाकिस्तान संघ व्यवस्थापनावर गोलंदाजी प्रशिक्षक नाराज

On: शनिवार, ऑक्टोबर 1, 2022 7:43 PM
Shaun Tait
---Advertisement---

सध्या इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघांत सात सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सहा सामन्यांमध्ये प्रत्येक संघाने प्रत्येकी तीन-तीन विजय मिळवले.  उभय संघातील सहावा टी-20 सामना शुक्रवारी, 30 सप्टेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट पत्रकारांशी बोलण्यासाठी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. 

या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज फिल सॉल्ट (Phil Salt) याने 41 चेंडूत नाबाद 88 धावा ठोकल्या. तत्पूर्वी पाकिस्तानने 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 169 धावांचे लक्ष्य उभे केले होते. सॉल्टच्या वादळी खेळीच्या जोरावर इंग्लंडने हे लक्ष्य 14.3 षटकांमध्ये आणि 2 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने 59 चेंडूत नाबाद 87 धावांची खेळी केली.  सात सामन्यांची ही टी-20 मालिका सध्या बरोबरीवर (3-3) आहे. मालिकेतील शेवटचा सामना 2 ऑक्टोबर रोजी लाहोरमध्ये खेळला जाणार आहे.

मालिकेतील सहावा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानचा गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट (Shaun Tait) पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला. परंतु, याठिकाणी आल्यानंतर तो काहीसा नाराज दिसत होता. संघाने या सामन्यात चांगले प्रदर्शन केले नव्हतेच, पण त्याला पत्रकार परिषदेसाठी पाठवल्यामुळे देखील टेट नाराज असल्याचे दिसले. हारिस रउफच्या अनुपस्थितीत पाकिस्तानी गोलंदाज या सामन्यात समाधानकारक प्रदर्शन करू शकले नाही.

गोलंदाजांच्या खराब प्रदर्शनानंतर पत्रकार याबाबतीत प्रश्न विचारणार हे स्पष्टच होते. अशात संघातील इतर सर्वांना गोलंदाजी प्रशिक्षकांनाच पुढे केल्याचे दिसले. परिषदेत आल्यानंतर टेट म्हणाला की, “आम्ही जेव्हा कधी वाईट पद्धतीने पराभूत होतो, तेव्हा ते मला पुढे पाठवतात. जेव्हा आम्हाला कडवे आव्हान मिळते, तेव्हाही असेच होते.” गोलंदाजी प्रसिक्षकांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे बोर्डचे मॉडरेटर टेटसोरच्या माईकचे बटन बंद करतात. मॅडरेटर टेट ठीक आहे ना? असेही विचारतो. चाहते असा अंदाज बांधत आहेत की, टेटला पत्रकार परिषदेत काय बोलायचे हे आधीच सांगितले गेले असावे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बुमराहच्या वर्ल्डकप खेळण्याविषयी द्रविड यांनी दिले सर्वात महत्त्वाचे अपडेट; वाचा काय म्हणाले
देशांतर्गत हंगामावर सर्फराजचे ‘राज’! इराणी ट्रॉफी फायनलमध्ये ठोकले नाबाद वादळी शतक   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---