विंडीजचा संघ ३१ मे रोजी विश्व एकादश (वर्ल्ड ११) बरोबर एक टी२० सामना लॉर्ड्स येथे खेळणार आहे. या सामन्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून तो वेस्ट इंडिजमधील एका मैदानाचे नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळवला जाणार आहे.
यावेळी विश्व एकादश (वर्ल्ड ११) चा कर्णधार इयॉन मॉर्गन तर विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आहे.
विंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेल याचाही संघामध्ये समावेश आहे. रसेलने 1 वर्षाच्या बंदीनंतर फेब्रुवारीमध्ये पुनरागमण केले होते. तो डोपिंग टेस्टमध्ये अपयशी झाल्याने वाडाने (वर्ल्ड अॅण्टी डोपिंग एजेन्सी) त्याच्यावर बंदी आणली होती.
यावर्षीच्या आयपीेएलमध्ये रसेल कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात त्याने 36 चेंडूत 88 धावा केल्या होत्या. यामध्ये 11 षट्कारांचा समावेश होता. तसेच दिल्ली विरूध्दच्या सामन्यात 12 चेंडूत 41 धावा केल्या होत्या. तसेच जास्त षटकारांच्या यादीत तो 19 षट्कारांसह पहिल्या स्थानी आहे.
” जे खेळाडू पाकिस्तान दौऱ्यात नव्हते पण आता या सामन्यातून पुनरागमण करत आहे त्यांचे मी स्वागत करतो. खासकरून आंद्रे रसेलला संघात बघून आनंद झाला आहे. कारण तो या टी२० प्रकाराचा महत्वाचा खेळाडू आहे “, असे विंडींजचे संघ निवडीचे अध्यक्ष कर्टनी ब्राऊने म्हणाले.
रसेलप्रमाणेच सलामीचे फलंदाज ख्रिस गेल आणि इविन लेविस यांच्या समावेशाने एकप्रकारचे उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिनेश रामदीन आणि किमो पॉल या खेळाडूंची कामगिरी उत्तम असल्याने त्यांचे स्थान संघात कायम आहे.
विंडीजचा संघ: कार्लोस ब्रेथवेट ( कर्णधार ), रयाद इम्रित, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, इविन लेविस, अॅश्ले नर्स, किमो पॉल, दिनेश रामदीन, रोवमन पोवेल, आंद्रे रसेल, सॅमुअल बद्री, मार्लोन सॅमुअल्स, केसरिक, विलीयम्स
महत्वाच्या बातम्या: