2024 पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाली आहे. हे ऑलिम्पिक गाजलं ते यामध्ये झालेल्या विविध वादांनी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गाजलेला सर्वात मोठा वाद म्हणजे बॉक्सिंग खेळाडूंच्या जेंडरचा वाद.
प्रथम अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफच्या जेंडरवरून वाद झाला. महिला बॉक्सिंगच्या 66 किलो गटात सहभागी झालेल्या इमाननं सुवर्णपदक पटकावलं. मात्र तिच्या महिला असण्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता तैवानची बॉक्सर ‘लिन यू टिंग’चं सुवर्णपदकही वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. इमान खलिफा आणि लिन यू टिंग या दोघींनाही 2023 जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बंदी घालण्यात आली होती. या दोन्ही बॉक्सर जेंडर चाचणी उत्तीर्ण करू शकल्या नव्हत्या.
इमाननंतर तैवानच्या लिन यू टिंगनं महिला बॉक्सिंगच्या 57 किलो गटात सुवर्णपदक जिंकलं. तिनं सुवर्णपदकाच्या लढतीत पोलंडची बॉक्सर ज्युलिया झेरेमेटाचा पराभव केला. तैवानच्या बॉक्सरनं फायनलमध्ये 5-0 असा सहज विजय मिळवला. त्यानंतर आता सोशल मीडियावर टिंगच्या महिला असण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लिन यू टिंगवर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बंदी घालण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं मात्र यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळाली, ज्यात तिनं एकतर्फी सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीपर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये तैवानच्या बॉक्सरनं अगदी सहज विजय मिळवला.
लिन यू टिंगनं राऊंड ऑफ 16 मध्ये उझबेकिस्तानच्या सितोरा तारदीबेकोवाचा 5-0 असा पराभव केला. त्यानंतर तिनं उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बल्गेरियाच्या स्वेतलाना स्टॅनिव्हा हिचा पराभव केला. लिन यू टिंगनं हा सामनाही 5-0 ने जिंकला. उपांत्य फेरीच्या सामन्यात लिन यू टिंगनं तुर्कीच्या इसरा यिल्डीझ कहरामनचा 5-0 असा पराभव केला. अखेर फायनमध्येही टिंगनं पोलंडच्या बॉक्सरवर 5-0 असा विजय मिळवत एकतर्फी सुवर्णपदक पटकावलं.
हेही वाचा –
मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरी, कारण जाणून तुम्ही पण व्हाल थक्कं!
एकही सुवर्णपदक नाही! पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा प्रवास संपला; एकूण कामगिरी निराशाजनकच
विनेश फोगटच्या अपात्रेबाबत मोठं अपडेट समोर, या दिवशी होणार अंतिम निर्णय