लंडन। आजपासून(24 जूलै) लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात एकमेव चार दिवसीय कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज बॉयड रँकिन आयर्लंडकडून दुसरा कसोटी सामना खेळत आहे.
विशेष म्हणजे त्याने त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना 2013-14 च्या ऍशेज मालिकेत इंग्लंडकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. त्याने इंग्लंडकडून हा एकमेव कसोटी सामना खेळला. त्यामुळे तो इंग्लंडसाठी आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणारा केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी इफ्तिखार अली खान पतौडी(मंसूर अली खान पतौडी यांचे वडील) यांनी इंग्लंडकडून आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला आहे. त्यांनी डिसेंबर 1932 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या पहिल्याच सामन्यात त्यांनी 102 धावांची शतकी खेळी केली होती.
त्यानंतर ते कारकिर्दीत इंग्लंडकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 कसोटी सामने खेळले. तर नंतर 1946 ला भारताकडून इंग्लंडविरुद्ध 3 कसोटी सामने खेळले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत हेच सहा कसोटी सामने खेळले. या सहा सामन्यात त्यांनी 199 धावा केल्या होत्या.
आजपासून सुरु झालेल्या इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 23.4 षटकात 85 धावांवर संपूष्टात आला आहे. आयर्लंडकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना टिम मुर्तघने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मार्क आदेरने 3 विकेट्स आणि बॉयड रँकिनने 2 विकेट्स घेतल्या आहेत.
🗓️ 3 Jan 2014 → Boyd Rankin makes his Test debut for England
🗓️ 24 June 2019 → Boyd Rankin is set to represent Ireland in a Test against Englandhttps://t.co/RDLMHmzLhA— ICC (@ICC) July 23, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–गौतम गंभीर आता क्रिकेटच्या नाही तर उतरला कबड्डीच्या मैदानात!
–१० दिवसांपूर्वी ज्या मैदानावर मिळवले विश्वविजेतेपद त्याच मैदानावर इंग्लंडची आज झाली अशी अवस्था
–…म्हणून विराट कोहलीने घेतली नाही विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती