महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वराज्य प्रतिष्ठान विक्रोळी या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार सुनील राऊत चषक व्यवसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सोमवारी(14 जानेवारी) अंतिम फेरी पार पडली.
या स्पर्धेत पुरुषांच्या गटात भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) संघाने विजेतेपद मिळवले. त्यांनी अंतिम सामन्यात एअर इंडियाचा 26-25 अशा फराकाने थरारक पराभव केला. बीपीसीएलने पहिल्या सत्रात 16-10 अशी आघाडी घेतली होती.
बीपीसीएलकडून अजिंक्य कापरे आणि गिरिष एर्नाकने चांगली कामगिरी केली. तसेच एअर इंडियाकडून आदित्य शिंदे, शुभम शिंदे आणि अस्लम इनामदार यांनी चांगला संघर्ष केला. परंतू त्यांना संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
या अंतिम सामन्याआधी उपांत्य सामन्यात बीपीसीएलने देना बँक संघाला तर एअर इंडियाने यूनियन बँक संघाला पराभूत केले होते.
त्याचबरोबर या स्पर्धेत महिलांच्या गटात पश्चिम रेल्वेने अंतिम फेरीत डब्ल्यूई इन्फाचा 36-32 असा पराभव केला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. त्यांच्याकडून सोनाली शिंगटे, मिनल जाधव यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
उपांत्य फेरीत महिलांच्या गटात पश्चिम रेल्वेने ठाणे महानगरपालिका संघाचा तर डब्ल्यूटीई इन्फाने देना बँक संघाचा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले होते.
ही स्पर्धा 10 ते 14 जानेवारी, 2019 दरम्यान कै, रविंद्र म्हात्रे ग्राउंड, विक्रोळी, पूर्व मुंबई, येथे पार पडली.
आमदार सुनील राऊत चषकचे निकाल –
पुरुष गट –
विजेते – भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)
उपविजेते – एअर इंडिया
तिसरे स्थान – देना बँक
चौथे स्थान – युनियन बँक
सर्वोत्तर चढाईपटू – अस्लम इनामदार (एअर इंडिया)
सर्वोत्तम बचावपटू – आदित्य शिंदे (एअर इंडिया)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – अजिंक्य कापरे (बीपीसीएल)
महिला गट –
विजेते – पश्चिम रेल्वे कबड्डी संघ
उपविजेते – डब्ल्यूटीई इन्फा
तिसरे स्थान – ठाणे महानगरपालिका
चौथे स्थान – देना बँक
सर्वोत्तम चढाईपटू – स्नेहल शिंदे (डब्ल्यूटीई इन्फा)
सर्वोत्तम बचावपटू – अंकिता जगताप (डब्ल्यूटीई इन्फा)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – सोनाली शिंगटे (पश्चिम रेल्वे)
महत्त्वाच्या बातम्या-
–३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
–ऍडलेड ठरले विराट कोहलीसाठी लकी