बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) ७ फेब्रुवारीला सिलहट सनरायजर्सचा खुलना टायगर्स विरुद्ध सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाचा अष्टपैलू रवी बोपाराला चेंडू छेडछाड प्रकरणात सामना फीच्या ७५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या चुकीचा फटका सिलहट सनरायझर्सलाही बसला आहे. त्यांना विरोधी संघाला पाच धावा पेनल्टी म्हणून द्याव्या लागल्या. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. खुलना टायगर्स विरुद्धच्या सामन्यात सिलहट सनरायझर्सचे नेतृत्व करणाऱ्या बोपाराच्या खात्यात तीन डिमेरिट्स गुणांची नोंद झाली आहे.
सामन्याच्या ९ व्या षटकात घडलेला हा प्रकार आहे. कर्णधार बोपारा कॅमेरामध्ये गोलंदाजी करण्यापूर्वी चेंडूवर नखे लावताना दिसला आहे. सामना अधिकारी देबब्रत पाल यांनी बोपारावर सुरुवातीला तीन सामन्यांची बंदी घातली होती. अंतिम निर्णय बिपीएल स्पर्धेची तांत्रिक समिती म्हणजे एएसएम रोकीबुल हसन हे घेणार होते. बोपाराच्या अपीलानंतर तांत्रिक समितीने बुधवारी (८ फेब्रुवारी) त्याला कमी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
सामना अधिकारी देबब्रत पाल यांनी लावलेल्या तीन सामन्यांच्या बंदीच्या विरोधात बोपाराने अपील केले. लेव्हल ३ (२.१४) उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर बिपीएलच्या तांत्रिक समितीने त्याला दंड मंजूर केला. क्रिकेटच्या कायद्यांतर्गत बोपारा कारवाई कलम ४१.३ नुसार दोषी आढळला आहे. ज्यामध्ये खेळाडूने चेंडूसोबत छेडछाड केली असेल तर पंच चेंडू बदलू शकतात.
Sylhet has been fined 5 runs in Bopara's ball tempering. Sylhet captain Ravi Bopara is changing the shape of the ball with a knock. pic.twitter.com/otex4xBpSr
— Jimmy Jacobs (@R_Jdragon100) February 8, 2022
या सामन्यामध्ये मैदानावरील पंच महफुजुर रहमान आणि प्रगीत रामबुकवेला यांना ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी त्याच्याकडून चेंडू काढून घेतला. बोपारा आणि यष्टिरक्षक अनामूल हक या दोघांनी पंचांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सिलहट सनरायझर्सला पाच धावांचा दंड ठोठावण्यात आला.
कलम ७.५ नुसार बोपाराने स्पर्धेत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळविल्यास त्याला निलंबनाचा सामना करावा लागु शकतो. आता बुधवारी(९ फेब्रुवारी)सिलहट सनरायझर्सचा सामना कोमिल्ला व्हिक्टोरियन्सशी होणार आहे.
सिलहट सनरायझर्सचे कर्णधारपद मोसाद्देक हुसेनऐवजी बोपाराने भूषवण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्याच्या पहिल्याच सामन्यात तो चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळला आहे. परंतु या घटनेनंतर तो पुन्हा सामन्यात गोलंदाजी करतानाही दिसला.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीज क्रिकेटरच्या घरी जन्मली छोटी परी, भारतातील ‘ईडन गार्डन’वरून केले लेकीचे नामकरण; वाचा कारण
कोणाच्या खोलीत सर्वात जास्त पसारा असतो? खट्याळ पंतकडून ‘त्या’ आळशी क्रिकेटरची पोलखोल
विंडीजच्या घातक गोलंदाजालाही नाही घाबरला स्पिनर चहल, बेधडक स्ट्रेट ड्राईव्ह खेळत ठोकला चौकार