भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीत पार पडला. हा सामना भारतीय संघाने अनिर्णीत राखला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रॅड हॅडिन यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कधी असा विचार केला नव्हता की भारतीय संघ सिडनी कसोटी सामन्यात या प्रकारे पुनरागमन करेल.
170 सेन ब्रेकफास्टवर चर्चा करताना ब्रॅड हॅडिन यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचे खूप कौतुक केले. ते म्हणाले की रिषभ पंतला अगोदर फलंदाजी करण्यासाठी पाठवून वेगळी चाल खेळली. त्याचबरोबर ही चाल खूप महत्त्वपूर्ण ठरली.
ब्रॅड हॅडिन म्हणाले, “जर प्रामाणिकपणे बोलायचे झाले, तर मला वाटले नव्हते की, भारतीय अशा प्रकारे पुनरागमन करेल. ज्या प्रकारे भारतीय संघाने काल कामगिरी केली, अर्थातच ती कौतुकास्पद होती. भारतीय संघ सुरुवातीपासून सामना अनिर्णित करू शकत होते. परंतु अजिंक्य रहाणे रिषभ पंतला फलंदाजीला बढती देऊन खूप छान निर्णय घेतला.”
रिषभ पंतच्या आक्रमक फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघ दबावात आला – ब्रॅड हॅडिन
ब्रॅड हॅडिन म्हणाले,” जर तुम्ही लक्ष देवून बघितले, तर अजिंक्यने पंतला वरती फलंदाजीला पाठवून खेळ पुढे घेवून जाण्यास सांगितले. पंतने सुद्धा तसेच केले. त्याने दमदार खेळी केली. त्यामुळे टीम पेनने दबावात येऊन असे निर्णय घेतले. त्यानंतर हनुमा विहारी आला आणि खेळपट्टीवर स्थिरावला. चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे दोघेही एकाच प्रकारचे खेळाडू आहेत. ”
भारतीय संघाकडून तिसऱ्या कसोटीत शेवटच्या दिवशी रिषभ पंतने 118 चेंडूचा सामना करताना 12 चौकार आणि 3 षटकार खेचत दमदार 97 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 205 चेंडूचा सामना करताना 12 चौकारांच्या सहाय्याने 77 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यांनंतर अश्विन आणि विहारी यांनी चिवट फलंदाजी करतांना सामना अनिर्णीत राखला. दुसर्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याचबरोबर पॅट कमिन्स याने 1 गडी बाद केला.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सेहवाग म्हणतोय, ब्रिस्बेन कसोटी खेळण्यास तयार, फक्त ऑस्ट्रेलियाला जाण्याची सोय करा
“भारताविरुद्धची मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बदलला तर मला आश्चर्य वाटणार नाही”