---Advertisement---

“भारताला ब्रिस्बेनला जायचं नाही कारण ऑस्ट्रेलिया तिथे नेहमीच जिंकतो”, ऑसी क्रिकेटरचे खळबळजनक वक्तव्य

On: सोमवार, जानेवारी 4, 2021 1:02 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सिरीजमधील अखेरचे दोन सामने उरले आहेत. या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार असून, चौथा आणि शेवटचा सामना १५ जानेवारीपासून ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. मात्र चौथ्या सामन्याच्या ठिकाणावरुन वाद निर्माण झाला आहे. अशात ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक ब्रॅड हेडिन यांनी भारतीय संघाला टोमणा मारला आहे.

फॉक्स क्रिकेटशी बोलताना हेडिन म्हणाले की, “क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहा, भारतीय संघाला ब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडियमवर चौथा कसोटी सामना का खेळायचा नाही?. कारण यजमान ऑस्ट्रेलिया संघाव्यतिरिक्त या मैदानावर कोणीही जिंकू शकत नाही.”

“सर्वजण क्वारंटाइनचे काटोकोरपणे पालन करतील, तरच कोणत्याही राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडणार नाहीत. तुम्हाला आधीपासूनच कल्पना होती की, ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला माहीती होते की, इथे बंधने असतील, तुमच्यावर पुढेही अशी वेळ येईल,” असे पुढे बोलताना ते म्हणाले.

तसेच शेवटी हेडिन यांनी सांगितले की, “मला हे मान्य आहे की, पहिल्यांदा आयपीएल त्यानंतर आस्ट्रेलियात तुम्हाला क्वारंटाइनमध्ये रहावे लागले आहे. पण ऑस्ट्रेलिया संघालाही क्वारंटाइनचे पालन करावे लागले आहे. मग त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवल्याचे आमच्या कानी आले नाही.”

असा निर्माण झाला ब्रिस्बेन कसोटीचा वाद

माध्यमांतील वृत्तानुसार, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापूर्वी दुबईत क्वारंटाईनमध्ये रहावे लागले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर त्यांना पुन्हा १४ दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करावा लागला होता. ‌म्हणजे भारतीय संघ जवळपास १ महिना क्वारंटाईनमध्ये राहिला आहे. अशात चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला गेल्यास परत भारतीय संघाला एका रुममध्ये कैद रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनऐवजी सिडनी येथे खेळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी क्विन्सलँडची यात्रा करण्यास उत्सुक नसल्याचे कळल्यानंतर तेथील क्रीडामंत्री टिम मंडेर यांनी भाष्य केले आहे. “जर भारतीय संघाला आमच्या नियमांनुसार चालायचे नसेल, तर त्यांनी चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला येऊ नये,” असे त्यांनी सांगितले आहे. अशात चौथा कसोटी कसोटी सामना नक्की कुठे खेळवला जाईल? हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

“दर्शक स्टेडिममध्ये आणि आम्ही मात्र क्वारंटाइन, ही कसली वागणूक?” टीम इंडियाचा आरोप

केन विलियम्सनचा पुन्हा शतकी धमाका! ‘हा’ विक्रम करत विराटलाही टाकलंय मागे

सौरव गांगुलीला येत्या २-३ दिवसांत मिळणार डिस्चार्ज? रुग्णालयाने दिले हेल्थ अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---