---Advertisement---

पंच धोनीला नियंत्रणात ठेवू शकत नाहीत! सीएसके कर्णधाराच्या रणनीतीवर ऑस्ट्रेलियन दिग्गज नाराज

On: बुधवार, मे 24, 2023 7:11 PM
MS Dhoni with umpire
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर एक सामना रोमांचक ठरला. मंगळवारी (23 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने 15 धावांना विजय मिळवला. सीएसके आयपीएल 2023मध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. असे असले तरी, क्वॉलिफायर सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याचे एक कृत्य वादाचे कारण ठरत आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा माजी दिग्गज ब्रॅड हॉग यानेही धोनीच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.

चेन्नईने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. 20 षटकांमध्ये सीएसकेने 7 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्स 20 षटकांमध्ये 157 धावांपर्यंत मजल मारू शकला. गुजरातच्या डावातील 16 वे षटक वादाचे राहिले. कारण पंच मथिशा पथिरानाला गोलंदाजी करू देत नव्हते. नियमानुसार पथिराना जितका वेळ मैदानाबाहेर होता, तितका वेळ त्याने मैदानात घालवल्यानंतरच त्याला गोलंदाजी करता येणार होती. अशात धोनीने 4 मिनिटे सामना थांबल्याचे पाहायला मिळाले. पंचांसोबतच्या वादामुळे हा सामना थांबला असे म्हणता येणार नाही. कारण धोनीची ही रणनीती होती, जी सीएसकेच्या कामी आली.

सीएसके हे 16व्या षटक महत्वाचे असल्यामुळे मथिशा पथिरानाने गोलंदाजीला यावे, अशी धोनीची इच्छा होती. या षटकाआधी पथिराना 8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानातून बाहेर होता. अशात त्याला गोलंदाजी करायची असेल, तर थेट 17 व्या षटकात संधी मिळणार होती. मात्र, धोनीने हुशारी दाखवत पंचांची चार मिनिटे चर्चा केली वेळ भरून काठला. यानंतर पंचांनी देखील पथिरानाला गोलंदाजी करू दिली. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ब्रॉड हॉगच्या मते धोनीचे ही रणनीती योग्य नव्हती.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हॉगने बुधवारी (24 मे) याविषयी नाराजी व्यक्त केली. त्याने ट्वीट केले की, “धोनीने आपल्या उफस्थितीचा पूर्ण फायदा उचलला. त्याने पंचांना चार मिनिटे स्वतःसोबत अडकवून ठेवले. जेणेकरून पथिरानाला गोलंदाजी करता येईल. पंचांनी अशा वेळी परिस्थित सांभाळली पाहिजे होती. मात्र, त्यांना हे मजले नाही. पंच धोनीसोबत हसताना दिसले, जे अपेक्षित नव्हते.”

https://twitter.com/Brad_Hogg/status/1661190025730740225?s=20

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा सीएसकेसाठी मॅच विनर ठरला. त्याने 44 चेंडूत सर्वादिक 60 धावांची खेळी केली, ज्यासाठी सामनावीर पुरस्कार देखील त्याला दिला गेला. गुजरातसाठी शुबमन गिलने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. दीपक चाहर, महिशा थिक्षणा, रविंद्र जडेजा आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडेलाही एक विकेट मिळाली. गुजरातच्या गोलंदाजी आक्रमाणाचा विचार केला, तर मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दर्शन नलकांडे, राशिद खान, नुर अहमद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. (Brad Hogg has expressed his displeasure over the tactics used by MS Dhoni against Gujarat Titans)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20त घडला इतिहास! भारतीय मूळ असलेल्या ‘या’ धुरंधराने 49 चेंडूत ठोकल्या 144 धावा, टोटल होती 324
Eliminator मॅचपूर्वी भज्जीने ठोकला दावा; म्हणाला, Mumbai Indians साठी ‘हा’ पठ्ठ्या ठरणार ट्रम्प कार्ड

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---