भारतीय क्रिकेटमधून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाशी संबंधित आहे. बीसीसीआयला आता नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सध्या बीसीसीआयचे अध्यक्षपद सौरव गांगुली भूषवत आहे. मात्र, त्याच्या अध्यक्षपदाचे आता काही दिवसच शिल्लक राहिले आहे. लवकरच बीसीसीआयच्या सर्व पदांसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. मात्र, गांगुली पुन्हा या पदाचा दावेदार नसल्याची माहिती आहे. अशात बीसीसीआयचा नवीन अध्यक्ष कोण असेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असताना एकाचे नाव निश्चित झाले आहे.
यासाठी दोन नावे पुढे येत असताना पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, भारताचे माजी क्रिकेटपटू आणि 1983चे विश्वचषक विजेते रॉजर बिन्नी (Roger Binny) हे बीसीसीआयचे अध्यक्ष होऊ शकतात. बिन्नी हे सध्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनमध्ये आहेत. तसेच ते भारताच्या निवडसमितीचेही सदस्य राहिले आहेत. तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली हे पुन्हा अध्यक्ष बनण्याच्या मूडमध्ये नाहीये. तसेच, सचिव जय शाहदेखील अध्यक्ष बनण्याच्या शर्यतीत नाहीयेत. मात्र, ते सचिव पदासाठी पुन्हा अर्ज करत आहेत.
बीसीसीआय मंत्रिमंडळातील एकमेव काँग्रेसचे सदस्य राजीव शुक्ला आहेत, ते उपाध्यक्षपदी कायम राहतील. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे भाऊ अरुण सिंह धुमाळ आता आयपीएलचे अध्यक्ष होणार आहेत. ते ब्रिजेश पटेल यांची जागा घेतील.
गांगुली यांनी 2019मध्ये बीसीसीआयच्या अध्यक्षपद स्विकारले होते. तसेच त्यांचे भारतीय क्रिकेट बोर्डबाबत भविष्यात काय विचार आहेत हे स्पष्ट झाले नसून काही रिपोर्ट्सनुसार, ते आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार अशा चर्चांना उधान आले आहे.
गांगुली मुंबईमध्ये असून बिन्नी हे पण सोमवारी मुंबईत पोहोचले आहेत. तसेच जय शाह, अरुण सिंह धूमाळ, राजीव शुकला आणि रोहन जेटली यांनाही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
येत्या 18 ऑक्टोबरला मिळणार बीसीसीआयला नवीन अध्यक्ष
बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही निवडणूक मुंबईत होणार आहे. यापूर्वी 11 आणि 12 ऑक्टोबरला दावेदार आपले नामांकन जमा करतील. त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी नामांकन पत्रांची तपासणी होईल. 14 ऑक्टोबरपर्यंत नावे परत घेता येऊ शकतील. तसेच, 15 ऑक्टोबरला नामांकन देणाऱ्यांची यादी जारी केली जाईल. त्यानंतर जर दोनपेक्षा जास्त दावेदार असतील, तर 18 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताला विश्वविजेते बनवणारे गॅरी कस्टर्न टी20 वर्ल्डकपमध्ये ‘या’ संघाचे कोच
एकेकाळी मॅगी खाऊन ढकलत होता दिवस; आज मनगटावर १ कोटीचं घड्याळ