बांग्लादेशचा संघ सध्या भारत दाैऱ्यावर आहे. जेथे दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाला पराभूत करुन. मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटीपूर्वी आता बांग्लादेश संघातून मोठी बातमी समोर येत आहे. जे की अलीकडेच हत्येच्या आरोपात असलेल्या शाकिब अल हसनशी संबधित आहे. वास्तविक, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शाकिब कानपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केली आहे.
शाकिब अल हसनने आज (26 सप्टेंबर) गुरुवारी जाहीर केले की पुढील महिन्यात मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेच्या शेवटी त्याने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडे (बीसीबी) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण, त्या मालिकेत खेळण्यासाठी सुरक्षा मंजूरी मिळवणे या अष्टपैलू खेळाडूवर अवलंबून आहे. जर शकीब त्या कसोटीत खेळू शकला नाही तर, भारताविरुद्ध चालू असलेल्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी कानपूरमध्ये सुरू होणार आहे. बांग्लादेशसाठी हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो.
SHAKIB AL HASAN WILL RETIRE FROM TESTS THIS YEAR…!!!
– Shakib confirms his final Test will be against South Africa at Mirpur. [Abhishek Tripathi] pic.twitter.com/5uoLdHRJ7Q
— Johns. (@CricCrazyJohns) September 26, 2024
शाकिबने चाहत्यांना दुहेरी धक्का दिला. तो म्हणाला की, तो तत्काळ प्रभावाने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. 2007 पासून प्रत्येक विश्वचषकात त्याने बांग्लादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून शाकिब निवृत्त होत आहे. तो म्हणाला, ‘टी20 आंतरराष्ट्रीयचा अध्यायही संस्मरणीय होता. पण आता ही जागा पुढच्या पिढीकडे देण्याची वेळ आली आहे.
शाकिबची गणना जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. कारकिर्दीतील शेवटचा सामना आपल्या मायदेशात खेळायचा आहे. अशी इच्छा त्याने व्यक्त केली. बांग्लादेशची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका पुढील महिन्यात होणार आहे. तो म्हणाला, ‘माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर माझी कसोटी कारकीर्द संपवणे योग्य ठरेल. असे वाटते. बांग्लादेश क्रिकेटने मला खूप काही दिले आहे आणि मला या फॉरमॅटमध्ये माझा शेवटचा सामना घरच्या भूमीवर खेळायला आवडेल.
शाकिबने 2007 मध्ये बांग्लादेशसाठी पहिला कसोटी सामना खेळला. 17 वर्षांहून अधिक काळ तो बांग्लादेशचा स्टार खेळाडू होता. शाकिबने बांग्लादेशी संघाला मोठा पाठिंबा दिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 230 विकेट घेण्यासोबतच 4600 धावाही केल्या आहेत.
हेही वाचा-
अश्विन आणि कोहलीच्या पगारात चक्क इतकं फरक! कसोटीसाठी दोन्ही दिग्गजांना किती पैसे मिळतात?
राशिद खाननं केला वयाचा घोटाळा? अफगाणिस्तानच्या कर्णधारानं सांगितलं खरं वय
“आता शिकला नाही तर कधी शिकणार…”, पाकिस्तानी दिग्गजाने भारतीय स्टार खेळाडूला सुनावले