भारताचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) जगातील विस्फोटक फलंदाजांपैकी एक खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. जे काही तुटले, तर काही अजूनही त्याच्याच नावावर आहे. या बातमीद्वारे आपण सेहवागच्या अशा 5 रेकाॅर्डबद्दल जाणून घेऊया, जे कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे अशक्य ठरू शकते.
वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आपल्या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांवर अनेक वेळा वर्चस्व गाजवले आहे. सेहवागच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून मोठी खेळी खेळण्याचा रेकाॅर्ड आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून 219 धावांची खेळी खेळली आहे, जो एक विश्वविक्रम आहे. सेहवागचा हा रेकाॅर्ड जगातील कोणत्याही कर्णधाराला मोडता आला नाही.
वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याचा विश्वविक्रम आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 278 चेंडूत त्रिशतक ठोकले आहे. कसोटी क्रिकेटमधील कोणत्याही फलंदाजाचे हे सर्वात जलद त्रिशतक आहे. त्याने 2008 मध्ये चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा रेकाॅर्ड केला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड सेहवागच्या नावावर आहे. एका दिवसात सर्वाधिक नाबाद 284 धावा केल्या आहेत, जी भारताकडून एका दिवसातील कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. 2009 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या कसोटीत सेहवागने ही खेळी श्रीलंकेविरुद्ध खेळली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये 2 त्रिशतके झळकावणारा वीरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय आहे. त्याने पाकिस्तान दौऱ्यावरील मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावले होते, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरे त्रिशतक झळकावले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक, द्विशतक आणि त्रिशतक ठोकण्याचा रेकाॅर्ड फक्त वीरेंद्र सेहवागनेच केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हा जगातील एकमेव फलंदाज आहे, ज्याने सिंगल एकदिवसीय विश्वचषकाच्या पहिल्या 5 सामन्यात चौकार लगावले. सेहवागने 2011च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये सलग 5 सामन्यांमध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार मारून खाते उघडले होते. जगातील कोणत्याही फलंदाजासाठी हा अनोखा रेकाॅर्ड मोडणे कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत केएल राहुलसह ‘या’ खेळाडूची होणार सुट्टी?
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, दुखापतीनंतर परतला अत्यंत महत्त्वाचा खेळाडू
IND vs NZ; “आम्ही जोरदार पुनरागमन…” पराभवानंतर स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य