भारत आणि दक्षिण आफ्रिका (Test series IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेचा पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कमाल कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पूर्णपणे कोसळले. बुमराहने आपल्या कारकिर्दीतील 16वा ‘5 विकेट हॉल’ घेत मोठा दणका दिला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुमराहने 5 महत्त्वाचे फलंदाज बाद केले. त्याने आफ्रिकेला पहिला धक्का रियान रिकेल्टनला आऊट करून दिला. त्यानंतर दुसरा मोठा धक्का सलामी फलंदाज एडेन मार्करमला बाद करून दिला. त्याने तिसऱ्यांदा टोनी जी याला बाद केले. त्यानंतर जोरजी याला आऊट केले. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेची शेवटची दोन विकेटही घेतली आणि अशा प्रकारे 5 विकेट्सची कमाल केली.
बुमराहने आपल्या स्पेलमध्ये 14 षटके टाकत एकूण 27 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. यामध्ये त्याने 5 मेडन षटकेही टाकले.
आत्तापर्यंत बुमराहने इंग्लंडच्या मैदानावर 4 वेळा, ऑस्ट्रेलियात 4 वेळा ‘5 विकेट हॉल’ घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर त्याने 3 वेळा हे यश मिळवले असून भारताच्या मैदानावर हा त्याचा तिसरा ‘5 विकेट हॉल’ ठरला.






