क्रीडा जगतात प्रत्येक खेळाची सुरुवात ज्या सामन्याने होते ते सामने नेहमीच आठवणीचे असतात. असंच काहीतरी भारतातीतल सर्वात मोठी टी२० लीग आयपीएलविषयीही आहे. आयपीएलचा पहिला सामने १८ एप्रिल २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांमध्ये खेळण्यात आला होता.
त्या सामन्यात केकेआरकडून खेळताना न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने (Brendon McCullum) ७३ चेंडूत १५८ धावांची दीडशतकी खेळी केली होती. यामध्ये १० चौकार आणि १३ षटकारांचा समावेश आहे. मॅक्यूलमने आपल्या याच खेळीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना त्याने सांगितले की, याच सामन्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले.
सध्या मॅक्यूलम केकेआरचा मुख्य प्रशिक्षक आहे. केकेआरच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना त्याने सांगितले की, “त्या सामन्यानंतर काय झाले, याबद्दल मला जास्त काही आठवत नाही. परंतु त्यावेळी सौरव गांगुली (Sourav Ganguly) मला म्हणाला होता की, तो माझ्या लक्षात आहे.”
“तत्कालीन कर्णधार गांगुली पुढे म्हणाला होता की, तुझे आयुष्य कायमचे बदलले आहे. त्याला काय म्हणायचे आहे, मला याचा अर्थ नाही समजला. परंतु मी त्याच्याशी १०० टक्के सहमत आहे. त्यावेळी शाहरूख खान (Shahrukh Khan) मला म्हणाला होता की, तू नेहमी केकेआरसोबत राहणार आहेस,” असेही यावेळी मॅक्यूलम म्हणाला.
मॅक्यूलम पुढे म्हणाला की, मी पुढील अनेव वर्षे केकेआरचे (Kolkata Knight Riders) प्रतिनिधित्व केले. यानंतर मला मुक्त करण्यात आले. परंतु आमच्यात नेहमी चांगले संबंध राहिले. केकेआरने मला दिलेल्या संधीबद्दल मी नेहमीच त्यांचा आभारी राहील.
त्यामुळे जेव्हाही मला या केकेआरसोबत जुळण्याची संधी मिळाली, तेव्हा मला शाहरूखचे ते वाक्य आठवले की तू नेहमी केकेआरसोबत राहणार आहेस. मला तेव्हा वाटले की, ही आणखी एक संधी आहे.
मॅक्यूलमने पुन्हा एकदा सांगितले की, त्या ३ तासांनी माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. त्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबियांचे आयुष्य कायमचे बदलले. त्यासाठी मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. हे सर्व मला माझ्या संघातील संघसहकाऱ्यांशिवाय करणे कठीण होते.
मॅक्क्युलमच्या त्या खेळीचा परिणाम म्हणजे आयपीएललाही त्याचा खूप फायदा झाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाहता पाहता १२ वर्ष झाली, आयपीएल सुरु झाली होती याच दिवशी १२ वर्षांपुर्वी
-वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज
-या कारणामुळे धोनीआधी टी२० विश्वचषकाला होणार दिनेश कार्तिकचा विचार