---Advertisement---

मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबणीवर? ‘ब्रेट ली’नं या युवा गोलंदाजाला BGT खेळण्याचा दिला सल्ला

---Advertisement---

आयपीएल 2024 पासून मयंक यादव त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच मयंकने बांग्लादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीच्या जागी मयंक यादव प्रभावी ठरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळणार की नाही, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. अशा परिस्थितीत ब्रेट ली म्हणाला की, जर शमी तयार नसेल तर किमान मयंकला तरी संघात ठेवावे.

ब्रेट ली फॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून म्हणाला, “मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा गोलंदाज 135-140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो तेव्हा फलंदाज आरामशीर त्याचा सामना करु शकतो. परंतु जेव्हा तुम्ही 150 किमीने चेंडू टाकता तेव्हा तो चेंडू फलंदाजाला खेळणे अवघड असते. मयंक 150 च्या किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत असेल तर तो संपूर्ण पॅकेज आहे. जर मोहम्मद शमी तयार नसेल तर किमान त्याला संघात समाविष्ट करा.

शमी गेल्या एक वर्षापासून दूर आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर त्याच्या टाचेची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता पुनरागमन करण्यासाठी तो प्रचंड घाम गाळत आहे. आता शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पुनरागमन करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची ट्रॉफी रंगणार आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 03 जानेवारी 2025 पासून खेळवला जाईल. आता मयंक यादवला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्थान मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा-

पुण्याच्या एमसीएवर किंग कोहलीची विराट कामगिरी, पाहा आकडेवारी
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत गंभीरच्या प्लॅनपुढे न्यूझीलंड ठरणार फेल?
झिम्बाब्वेने रचला इतिहास! बनला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---