---Advertisement---

‘मी आयुष्यात 10 वेळा सर्जरी केली, आता बुमराहदेखील लवकरच…’, ब्रेट लीचे ‘बूम बूम’विषयी मोठे भाष्य

On: शुक्रवार, मार्च 24, 2023 3:41 PM
Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारतीय संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील काही काळापासून पाठीच्या दुखापतीचा सामना करत आहे. नुकतेच त्याने न्यूझीलंडला जाऊन सर्जरी केली होती. या सर्जरीनंतर असे सांगण्यात आले आहे की, त्याला मैदानावर पुनरागमन करण्यासाठी कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी लागेल. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, वनडे विश्वचषक 2023पर्यंत बुमराहने मैदानात पुनरागमन करावे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने बुमराहबाबत मोठे विधान दिले आहे.

काय म्हणाला ब्रेट ली?
ब्रेट ली (Brett Lee) याचे भाष्य भारतीय चाहत्यांनाही दिलासा देणारे आहे. त्याने म्हटले की, “मी माझ्या आयुष्यात 10 वेळा सर्जरी केली आहे. मात्र, मी अजूनही गोलंदाजी करण्यात सक्षम आहे. जसप्रीत बुमराह ठीक होऊन जाईल.”

खरं तर, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भारतात परतेल. त्यानंतर वैद्यकीय पथक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे.

बुमराहच्या दुखापतीबाबत माहिती
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “बुमराहची पाठ सध्या नाजूक स्थितीत आहे. मागील वेळी बुमराहच्या पुनरागमनामध्ये घाई केली होती. कारण, त्यावेळी तो पूर्णत: फिट झाला नव्हता. त्यामुळे गोलंदाजीवेळी त्याला समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र, यावेळी आम्ही त्याच्याविषयी खूपच गंभीर आहोत. कारण, चुकीचा निर्णय त्याच्या कारकीर्दीला खूपच नुकसानदायक होऊ शकते.”

वृत्तांनुसार, बुमराह भारतात परतल्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) त्याच्यासाठी संपूर्ण योजना तयार करेल. खरं तर, बुमराह आयपीएल 2023 आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे आधीच बाहेर पडला आहे.

विशेष म्हणजे, यावेळी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन भारतात होणार आहे. अशात बुमराह विश्वचषकापूर्वी फिट व्हावे अशी भारतीय संघाची अपेक्षा असेल. बुमराह संघातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. या विश्वचषकात तो भारताच्या विजयाचा सर्वात फायदेशीर खेळाडू बनू शकतो. (brett lee talk will make indian fans happy expressed hope of pacer jasprit bumrah recovery)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नई वनडेतील पराभवानंतर दिग्गजाने विराटला सुनावले खडे बोल! म्हणाला, “अशा परिस्थितीत फटके खेळताना…”
केकेआरला खिंडार! IPL 2023पूर्वी आणखी एका खेळाडूला मोठी दुखापत, आता कसं होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---