---Advertisement---

“गतवर्षी त्याने ५ अर्धशतके झळकावली, यंदा शतक…,” आरसीबीच्या युवा शिलेदाराकडून ब्रायन लाराला मोठी अपेक्षा

On: रविवार, एप्रिल 18, 2021 1:00 PM
Devdutta Padikkal and Virat Kohli
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मानली जाते. या स्पर्धेने अनेक संघांना असे युवा खेळाडू दिले आहेत, ज्यांनी पुढे जाऊन स्वत:चे आणि आपल्या देशाचे नाव उंचावले आहे. असच एक खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. हा खेळाडू म्हणजे, देवदत्त पडीक्कल.

युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी सलामीला फलंदाजी करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देवदत्त पडीक्कलला माजी वेस्ट इंडिज फलंदाज ब्रायन लाराने सल्ला देत, तो यंदा शतक झळकावल अशी आशा व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२० स्पर्धेत देवदत्त पडीक्कलने उत्कृष्ट फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच ब्रायन लाराने स्टार स्पोर्ट्स सीलेक्टच्या एका शोमध्ये म्हटले की, “तो (देवदत्त पडीक्कल) एक उत्कृष्ट खेळाडू आहे. गतवर्षी त्याने पाच अर्धशतक झळकावले होते. त्याने चांगली फलंदाजी केली होती. तसेच विराट कोहलीसोबत मिळून त्याने चांगली भागीदारी केली होती. मला त्याला आयपीएल २०२१ स्पर्धेत चांगल्या धावा करताना, सामनावीर पुरस्कार पटकावताना आणि शतक करताना पाहायचं आहे. त्याला काही गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागणार आहे. मला माहित आहे की, त्याने इतक्या दिवसात सुधारणा केली असेल. तो या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करेल. ”

युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून सलामी फलंदाजी करताना पडीक्कलने १५ सामन्यात तब्बल ४७३ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने ५ अर्धशतक झळकावले होते. तसेच ७४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. आयपीएल २०२० स्पर्धेत ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार पटकावणाऱ्या पडीक्कलने आपल्या पहिल्या ४ सामन्यात ३ अर्धशतक झळकावले होते. असा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंडचा वेगाचा बादशहा, ज्याला मिळाली मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी; जाणून घ्या त्याच्याविषयी

आयपीएलच्या महासंग्रामाला आजच्या दिवशी झाली होती सुरुवात; ब्रेंडन मॅक्युलमने तब्बल १५८ धावा करत गाजवला होता दिवस

वडिलांच्या चुकीमुळे ‘रोहन’चा झाला ‘केएल राहुल’; वाचा भारताच्या या यष्टीरक्षकाच्या आयुष्यातील माहित नसलेले किस्से

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---