---Advertisement---

वियान मुल्डरच्या निर्णयावर ब्रायन लारांचा संताप, म्हणाले 400 धावांसाठी का नाही….

On: शुक्रवार, जुलै 11, 2025 1:36 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर वियान मुल्डर सध्या क्रिकेटविश्वात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. यामागचं कारण म्हणजे त्याने ब्रायन लारा यांच्या सन्मानार्थ घेतलेला एक मोठा निर्णय. जेव्हा त्याच्याकडे लाराच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा (400)* विक्रम मोडण्याची संधी होती, मात्र त्याने ती केली नाही.

झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायोमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुल्डरने भेदक फलंदाजी करत 367 धावा केल्या आणि नाबाद राहून स्वतःच दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव घोषित केला. विशेष म्हणजे तो स्वतःच संघाचा कर्णधार होता आणि सामना जिंकण्यासाठी भरपूर वेळ शिल्लक होता. त्यामुळे त्याच्या निर्णयावर चर्चेला उधाण आलं, काहींनी त्याच्या निर्णयाचं कौतुक केलं, तर काहींनी त्याचं विक्रम न मोडण्यावर नाराजी व्यक्त केली.

सुपरस्पोर्टला दिलेल्या मुलाखतीत वियान मुल्डरने खुलासा केला की, ब्रायन लाराशी याबाबत त्याची खास चर्चा झाली होती. मुल्डर म्हणाला, “लारांनी मला सांगितलं की मी माझा स्वतःचा वारसा घडवतो आहे आणि मला तो विक्रम मोडायला हवा होता. ते म्हणाले, विक्रम मोडण्यासाठीच असतात आणि पुढच्या वेळी अशी संधी मिळाली तर त्यांना मागे टाकावं अशी त्यांची इच्छा आहे.”

मुल्डरने पुढे असंही म्हटलं की, खेळाचा आदर करणं त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जर पुन्हा अशीच वेळ आली, तरीही तो तेच करेल. मात्र या निर्णयावर सर्वांची एकमताने प्रतिक्रिया नव्हती. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सीने यावर नाराजी व्यक्त केली, तर ख्रिस गेलसारख्या दिग्गज फलंदाजाने मुल्डरने विक्रम न मोडल्याचं मोठी चूक म्हटलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---