कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याच्या नावावर आहे. लाराने नाबाद 400 धावा केल्या होत्या आणि त्याचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. तर ब्रायन लाराने भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल हा विक्रम मोडू शकतो असे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘हा पराक्रम करण्याची क्षमता त्याच्यात आहे.’
ब्रायन लारा (Brian Lara) याने 10 एप्रिल 2004 रोजी इंग्लंडविरुद्ध 582 चेंडूत 400 धावांची नाबाद खेळी खेळली होती. या खेळीत त्याने 43 चौकार आणि 4 षटकार मारले. त्यानंतर एकाही फलंदाजाला एका डावात 400 धावा करता आल्या नाहीत. याशिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही ब्रायन लाराच्या नावावर आहे. 1994 मध्ये डरहम विरुद्धच्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात त्याने 501 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
लाराच्या मते शुबमन गिल (Shubman Gill) याच्यामध्ये हे दोन्ही विक्रम मोडण्याची क्षमता आहे. एका पत्राशी बोलताना तो म्हणाला, “शुबमन गिल माझे दोन्ही विक्रम मोडू शकतो. तो या पिढीतील सर्वात प्रतिभावान खेळाडू आहे. आगामी काळात तो क्रिकेटवर राज्य करेल. मला विश्वास आहे की, तो अनेक विक्रम मोडेल. तो माझा विक्रम मोडू शकतो. जर गिल काउंटी क्रिकेट खेळला तर तो माझा 501 नाबाद धावांचा विक्रम मोडू शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावांचा टप्पा नक्कीच पार करू शकतो. क्रिकेटमध्ये खूप बदल झाला आहे, विशेषतः फलंदाजीत. जगभरातील फलंदाज आता टी20 लीग खेळतात आणि आयपीएलने सर्व काही बदलले आहे. स्कोअरिंग रेट वाढला आहे आणि म्हणूनच तुम्हाला मोठे स्कोअर दिसत राहतात. शुबमन गिल खूप धावा करेल, माझे हे शब्द लक्षात ठेवा.” (Brian Lara’s Great Prophecy Said This young Indian player will break my record of 400 runs)
महत्वाच्या बातम्या
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमध्ये वाद, व्हिडिओ आला समोर
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नऊ मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का