---Advertisement---

भारतप्रेम की वेडेपणा? लाईव्ह सामन्यात भारतीय खेळाडू असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे ‘हे’ ट्वीट व्हायरल

On: मंगळवार, ऑगस्ट 17, 2021 2:24 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर झाला. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र या सामन्यादरम्यान अनेक अशा गोष्टी घडल्या ज्या चर्चेचा विषय ठरल्या.

त्यातीलच एक म्हणजे शनिवारी (१४ ऑगस्ट) चालु सामन्यात एक ब्रिटिश नागरिक मैदानात घुसला होता. त्याने भारतीय संघाचा जर्सी परिधान केला होता. त्यामुळे तिथल्या व्यवस्थापकांना देखील लवकर समजले नाही. ज्या वेळेस ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. तेव्हा, व्यवस्थापक त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी मैदानात उतरले.

तो व्यक्ती भारतीय संघाचा खूप मोठा चाहता होता. त्यामुळे त्याने भारतीय संघासोबत क्षेत्ररक्षण करण्याचा हट्ट धरला होता. ज्यानंतर खूप समजावून सुरक्षा रक्षकांनी त्याला मैदानाच्या बाहेर नेऊन सोडले. यादरम्यान या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. केवळ प्रेक्षकांनाच नव्हे तर खेळाडूंना देखील हे पाहून हसू आवरले नाही. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, तर या घटनेनंतर जोर-जोरात हसू लागला होता.

आता त्याच ब्रिटिश नागरिकाने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने लिहिले आहे, “मी जारवो, मी तोच व्यक्ती आहे, जो मैदानात गेलो होतो. मला गर्व आहे की भारतीय संघाकडून खेळणारा मी पहिला ब्रिटीश व्यक्ती आहे.” आता हे ट्विट समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहे.

दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी भारताने जिंकला. अखेरच्या दिवशी सुरुवातीला भारतीय संघाने रिषभ पंत आणि इशांत शर्मा यांच्या रूपात लवकर विकेट्स गमावल्यानंतर शेवटच्या फळीतील मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. ज्यात शमीने अर्धशतकी खेळी करत ५६ धावा केल्या. तर बुमराहने ३४ धावा करत ८९ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारताने इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करतान इंग्लंडचा संघ १२० धावांवर सर्वबाद झाला.

महत्वाच्या बातम्या –
पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ नये म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २१ वर्षांपूर्वी लढवली होती ‘अशी’ भन्नाट शक्कल
लॉर्ड्सवर मिळवलेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयाची पाच महत्त्वाची कारणं, वाचा सविस्तर
‘आमच्या खेळाडूंना डिवचल्याने, आम्हाला जिंकण्याची प्रेरणाच मिळाली’, विराट इंग्लंडच्या जखमेवर चोळले मीठ

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---